मका खरेदी केंद्रे सुरु केली नसल्याने उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांचे नुकसानव्यापाऱ्यांकडून भाव पाडून मक्याची खरेदी शेतकऱ्यांचे रयत सेना कर्नाटकच्या नेतृत्त्वाखाली बेमुदत आंदोलन सुरू.Maize Procurement: राज्य सरकारने अद्याप मका खरेदी केंद्रे सुरु केली नसल्याने उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मका खरेदी केंद्रे सुरु करण्यास आणि किमान आधारभूत किमतीत (MSP) खरेदी सुरू करण्यास विलंब केला जात असल्याने ही समस्या निर्माण झाली. यामुळे धारवाड, गदग, हावेरी, बागलकोट आणि विजापूर जिल्ह्यांसह उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे..या पार्श्वभूमीवर शुक्रवारी, धारवाड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रयत सेना कर्नाटकच्या नेतृत्त्वाखाली नवलगुंद तालुक्यात बेमुदत आंदोलन सुरू केले. अतिवृष्टीमुळे मका पिकांचे मोठे नुकसान झाले. जवळपास २० टक्के मक्याचे पीक नष्ट झाले. तर काही ठिकाणी शेतातच मक्याला कोंब फुटले. यातून जे काही पीक मिळाले आहे; त्याची आता भाव पाडून खरेदी केली जात आहे..Maize Rate: मक्याचे बाजारभाव सध्या हमीभावापेक्षा ३० टक्क्यांपर्यंत कमी.केंद्र सरकारने मक्यासाठी प्रतिक्विंटल २,४०० रुपये किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. पण बाजार समितीत व्यापारी केवळ प्रतिक्विंटल १,४०० ते १,६०० रुपये दराने खरेदी करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे क्विंटलमागे ८०० रुपयांचे नुकसान होत आहे. .मूग, कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सरकारला जागे करण्यासाठी त्यांना तीव्र आंदोलन करावे लागले. मका खरेदी केंद्रे सुरू होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे..Maize Procurement: दुर्गम मेळघाटात तांत्रिक अडचणीमुळे रखडली मका खरेदी .२०२४ मध्ये केंद्र सरकारने मक्यासाठी निश्चित केलेला प्रतिक्विंटल २,४०० रुपये हमीभाव जुना आहे. कारण आता उत्पादन खर्च जवळपास दुप्पट झाला आहे. त्यात सुधारणा करून तो ३ हजार रुपये करावा, अशी मागणी केली जात आहे. .माजी मंत्री शंकर पाटील मुनेनाकोप्पा यांनी, सरकारला तत्काळ खरेदी केंद्रे सुरु करण्याची आणि किमान आधारभूत किमतीपेक्षा प्रतिक्विंटलमागे ६०० रुपये अतिरिक्त प्रोत्साहन रक्कम जाहीर करण्याची विनंती केली आहे. .१० लाख टन मका खरेदीचा निर्णयदरम्यान, राज्य सरकारने शुक्रवारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १० लाख टन मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला. उत्तर कर्नाटकात आंदोलन करणाऱ्या मका शेतकऱ्यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत; त्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बैठक बोलावली होती. यावेळी हा निर्णय घेण्यात आला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.