Electricity Meter Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Pumps : कृषिपंपांना प्रीपेड वीज मीटर बसविण्यास विरोध

Sanjay Ghatge : महावितरण आणि शासनाच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करील, असा इशारा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष संजय घाटगे यांनी दिला.

Team Agrowon

Pune News : महावितरण कंपनीकडून केवळ कृषिपंपांसाठी प्रीपेड मीटरची सक्ती चालू आहे. काही ठिकाणी महावितरण कंपनीने जबरदस्तीने कृषिपंपांना प्रीपेड मीटर बसविलेली आहेत, या बाबत महावितरणकडून खुलासा करून योग्य तो निर्णय घ्यावा.

अन्यथा, या विरोधी शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊन महावितरण आणि शासनाच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करील, असा इशारा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष संजय घाटगे यांनी दिला.

या वेळी महावितरणचे मुख्य अभियंता परेश भागवत यांना नुकतेच त्याबाबत निवेदन दिले. या वेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, कार्यकारी अभियंता दीपक पाटील, फेडरेशनचे उपाध्यक्ष विक्रांत पाटील-किनीकर, सचिव आर. जी. तांबे, राजेंद्र सूर्यवंशी, भारत पाटील-भुयेकर, सुनील मगदूम,

बाबासाहेब देवकर, सुभाष शहापुरे, आर. के. पाटील, सखाराम पाटील, सचिन जमदाडे, सागर पाटील, आनंदा कदम, सखाराम चव्हाण, एस. ए. कुलकर्णी, प्रकाश गुरव, कुंडलिक पाटील, महादेव सुतार, जगदीश पाटील, निवास पाटील, एम. जी. शेलार, इरिगेशन फेडरेशनचे सचिव मारुती पाटील आदी उपस्थित होते.

इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष संजय घाटगे म्हणाले, की कृषिपंपांसाठी प्रीपेड मीटर ही संकल्पनाच मुळात चुकीची व अन्यायकारक आहे. त्यामुळे कृषिपंपांना प्रीपेड मीटर बसविण्याचे तत्काळ थांबवावे. एम.ई.आर.सी. फीडरवर रीडिंग घेऊन अचूक वीजबिल आकारणी करून योग्य रीडिंगची वीजबिले मिळावीत.

काही ठिकाणी महावितरणकडून कृषिपंपांच्या वीजबिलाची आकारणी हॉर्सपॉवरवर केली जात आहे, ती थांबवून पूर्वीप्रमाणे मीटरवर आधारित वीजबिलाची आकारणी करावी. कारण कृषिपंपांना केवळ ८ तास वीज मिळते, शिवाय पावसाळ्यात विजेचा वापर नसताना वीजबिल भरावे लागणार आहे‌.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

Union Budget 2026: आर्थिक वाढीसाठी सर्वंकष प्रयत्नांचा संकल्प

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT