
मुंबई : मार्च २०१८ पर्यंत प्रलंबित असलेल्या उच्चदाब वितरण प्रणालीतून कनेक्शन दिलेल्या कृषी वीज पंप (Agriculture Pump) ग्राहकांना प्रिपेड मीटर (Prepaid Meter) देण्यात येणार आहेत. आगामी महिन्यात दीड लाख मीटर शेतकऱ्यांना देण्यात येणार असून, आगाऊ पैसे भरून वीज (electricity) विकत घेतली जाणार आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या कार्यकाळात उच्चदाब वितरण प्रणाली योजना आणली. या योजनेअंतर्गत मार्च २०१८ पर्यंत ज्या ग्राहकांनी पैसे भरूनही कनेक्शन मिळाले नव्हते. सव्वा लाख शेतकऱ्यांना याअंतर्गत सिंगल ट्रान्स्फॉर्मरमधून कनेक्शन दिली आहेत. या ट्रान्स्फॉर्मरवर एक किंवा दोन कनेक्शन दिली जातात. आठ तास वीजपुरवठा केला जातो. हे ट्रान्स्फॉर्मर शेतकऱ्याच्या मालकीचे असल्याने त्यांची देखभालही केली जाते. या शेतकऱ्यांसाठी प्रीपेड मीटर देण्यात येणार आहेत. यासाठी महावितरण रिचार्ज सिस्टिम वापरणार आहे. या यंत्रणेत महावितरण आणि शेतकऱ्यांना त्याची मेसेजप्रणालीवरून माहिती मिळेल, अशी यंत्रणा कार्यन्वित करण्यात येणार आहे. या कृषिग्राहकांना दीड लाख प्रीपेड मीटर बसविण्याची प्रक्रिया डिसेंबर महिन्यापर्यत पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच दहा लाख स्मार्ट मीटर खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. दीड लाख थ्रीफेज मीटर घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, या थ्रीफेज मीटरचा पुरवठा येत्या मे अखेरपर्यंत उपलब्ध होणार आहे. ग्राहकांची वाढती मागणी बघता आणखी २० लाख सिंगल फेज मीटर घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
१५ लाख मीटरचा पुरवठा करण्याचे आदेश
महावितरणकडून दरवर्षी सुमारे ८ ते ९ लाख नवीन घरगुती वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात. सोबतच नादुरुस्त व इतर कारणांमुळे मीटर बदलणे आदींसाठी महावितरणला दरमहा २ लाख मीटरची आवश्यकता भासते. सद्यःस्थितीत २२ एप्रिलपर्यंत महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये १ लाख, ३१ हजार ८०२ मीटर उपलब्ध आहेत. नवीन वीजमीटरच्या उपलब्धतेमध्ये आणखी वाढ करण्यासाठी येत्या सप्टेंबर २०२२ पर्यंत तब्बल १५ लाख नवीन वीजमीटरचा पुरवठा करण्याचा आदेश पुरवठादारांना देण्यात आला आहे. त्यानुसार येत्या ३० एप्रिलपर्यंत एक लाख आणि मे महिन्यात दोन लाख नवीन वीजमीटर उपलब्ध होतील. त्यानंतर जून ते सप्टेंबरपर्यंत प्रत्येक महिन्यात घरगुती जोडण्यांसाठी ३ लाख २७ हजार ५०० मीटर उपलब्ध होणार आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.