Electricity Connection : मराठवाड्यात ८ लाख नवीन वीज जोडण्या

Agriculture Electricity : महावितरण वीज ग्राहकांना तत्पर वीज सेवा देण्याबरोबरच मागेल त्यांना वीज जोडणी देण्याचा हा प्रयत्न आहे.
Electricity Connection
Electricity ConnectionAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : महावितरण छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालय अंतर्गत मराठवाड्यात १ डिसेंबर २०१८ ते १ डिसेंबर २०२३ या पाच वर्ष कालावधीत सर्व वर्गवारीतील सरासरी ७ लाख ९७ हजार ८२१ ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये विशेषतः ५ लाख ९३ हजार १७८ घरगुती वीज जोडण्याचा समावेश आहे.

महावितरण वीज ग्राहकांना तत्पर वीज सेवा देण्याबरोबरच मागेल त्यांना वीज जोडणी देण्याचा हा प्रयत्न आहे. नवीन वीज जोडणीसाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह महावितरणच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही महावितरणने केले आहे. महावितरण दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी सदैव आधुनिक सुविधांसह सज्ज आहे.

Electricity Connection
Electricity bill : ‘महापॉवर-पे’द्वारे तब्बल २१८ कोटींचा वीजबिल भरणा

त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी नव्या वीज जोडणीसाठीचे अर्ज तातडीने निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. ग्राहकांनी नव्या वीज जोडणीसाठी अर्ज केल्यानंतर महावितरणचे कर्मचारी जागेची पाहणी करून किती शुल्क भरायचे याची माहिती देतात.

त्यानुसार पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी शहरी भागातील ज्या ग्राहकांनी शुल्क भरले त्यांना चोवीस तासांत तर ग्रामीण भागात ४८ तासांत वीज जोडणी देण्यावर भर देण्यात आला. वीज जोडणी आवश्यक असल्यास त्या ठिकाणच्या जागेवर वीजबिलाची थकित थकबाकी नसली पाहिजे.

Electricity Connection
Electricity Meter : महावितरणचा मनमानी कारभार, शेतकऱ्यांना माहिती न देताच शेती पंपाची जुने वीज मीटर काढून नवे बसवले

वीज चोरीचा दंड प्रलंबित असू नये. नवीन वीज जोडणीसाठी दलाल अथवा मध्यस्थाशी संपर्क साधू नये. नागरिकांनी वीज जोडणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

मंडल कार्यालय नवीन जोडण्या

छत्रपती संभाजीनगर परिमंडल २ लाख ७७ हजार ००८

लातूर परिमंडल २ लाख ८३ हजार८२३

नांदेड परिमंडल २ लाख ३६ हजार ९९०

मराठवाडा एकूण ७ लाख ९७ हजार ८२१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com