Crop Insurance Agrown
ॲग्रो विशेष

Agriculture Crop Insurance : पीकविम्यासाठी उरले केवळ चार दिवस

Insurance Update : यवतमाळ जिल्ह्यातील चार लाख ३९१ शेतकऱ्यांनी आतापर्यंत तीन लाख ९३ हजार ८७९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचाच विमा उतरविला आहे.

Team Agrowon

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील चार लाख ३९१ शेतकऱ्यांनी आतापर्यंत तीन लाख ९३ हजार ८७९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचाच विमा उतरविला आहे. सुमारे ५० टक्के क्षेत्राचा विमा काढणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे पीकविम्याची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी होत आहे.

नैसर्गिक आपत्ती, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, तर कधी गारपीट आदींमुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ऐन काढणीच्या वेळी पाऊस येतो आणि पिके नष्ट होतात. याचा फटका शेतकरी बांधवांचा बसतो. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना काढली आहे. त्याअनुषंगाने १५ जूनपासून विमा उतरविण्यास सुरुवात झाली आहे.

यंदा मृग नक्षत्राने दगा दिल्याने पेरण्या उशिरा झाल्या. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना विमा काढणे शक्य झाले नाही. पावसाने जुलैत चांगलाच जोर धरला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. त्यांना शेतातील कामामुळे पीकविमा काढणे शक्य झाले नाही. जिल्ह्यात यंदा आठ लाख ८० हजार हेक्टरवर खरीप हंगामाचे नियोजन आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात चार लाख ३९१ शेतकऱ्यांनी तीन लाख ९३ हजार ८७९ हेक्टरवरील क्षेत्राचा वीमा काढला आहे. तर आणखी ५० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी पीकविमा काढलाच नाही.

विशेष म्हणजे पीकविमा भरण्यासाठी आता केवळ चार दिवस उरले आहेत. १५ जुलै रोजी विमा भरण्याची मुदत संपणार आहे. आता उर्वरित पाच दिवसांत ५० टक्के क्षेत्रावरील विमा काढावा लागणार आहे.

यंदा आतापर्यंत केवळ ५० टक्के क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविला आहे. उर्वरित क्षेत्रावरील विमा शेतकऱ्यांना पुढील पाच दिवसांत काढावा लागणार आहे. निर्धारित कालावधी शेतकऱ्यांनी अर्ज भरावे. सध्या मुदतवाढीबाबत कुठलेही आदेश नाही. तरीसुद्धा प्रधानमंत्री पीकविमा योजनेपासून कुणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घेऊ.
प्रमोद लव्हाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Third List: कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश

Sugar MSP: साखर 'एमएसपी' प्रश्नी दिल्लीतील बैठक निष्फळ, उद्यापासून महाराष्ट्र-कर्नाटकातील महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Canal Repair : पहिल्या आवर्तनापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करा

Solar Irrigation : सातारा जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेुळे उजळणार

Water Tanker Surge : टॅंकरच्या संख्येत झपाट्याने वाढ

SCROLL FOR NEXT