Crop Insurance : पीकविमा यंदाही गरजेचा; नियम बदलाचाही होतोय फायदा; पीकविमा भरण्यासाठी शेवटचे ४ दिवस बाकी, मुदतवाढीची शक्यता नाही

Agriculture Insurance Update : केंद्र सरकारने विमा भरपाई देण्याच्या सुत्रात बदल केल्यामुळे शेतकऱ्यांना मागील खरिपात पीक नुकसानीपोटी ७ हजार ७४९ कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली
Crop Insurance
Crop InsuranceAgrown
Published on
Updated on

Pune News : केंद्र सरकारने विमा भरपाई देण्याच्या सुत्रात बदल केल्यामुळे शेतकऱ्यांना मागील खरिपात पीक नुकसानीपोटी७ हजार ७४९ कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली. यंदाही पीक विमा जास्तच गरजेचा होणार आहे. कारण ऑगस्टनंतर ला निना परिस्थिती सक्रीय होऊन चांगल्या पावसाचा अंदाज आहे. म्हणजेच खरिपातील पीकं काढणीच्या काळात यंदाही पावसाने नुकसान होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना पीकविम्यातून भरपाई मिळेल. त्यासाठी पीकविमा योजनेत सहभाग घेणे गरजेचे आहे.

यंदा विमा अर्ज भरण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत आहे. तर आतापर्यंत १ कोटी ३ लाख शेतकरी अर्ज आले आहेत. विमा भरण्याला आणखी ४ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे पीक नुकसानीच्या संकटात आधार मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर विमा अर्ज भरावेत, असे आवाहन कृषी आयुक्तालयाने केले आहे.

केंद्र सरकारने मार्च महिन्यात विमा योनजेत भरपाई देण्याच्या सुत्रात महत्वाचा बदल केला. यामुळे शेतकऱ्यांना जास्त भरपाई मिळणार आहे. आधी अग्रीम भरपाई, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान भरपाई पीक कापणी प्रयोगातून मिळणाऱ्या भरपाईतून वजा केले जायचे. यामुळे शेतकऱ्यांना कमी भरपाई मिळायची. पण आता केंद्राने एकून संरक्षित रकमेतून प्रत्येक टप्प्यावर मिळणारी भरपाई वजा केली जाईल, असा नियम केला.

पीक विमा योनजेत आणखी एक बदल म्हणजे, यापुढे पीक विमा भरपाई केंद्र शासनाच्या विमा पोर्टलद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे विमा अर्ज भरताना आता आधार संलग्न बॅंक खातेच द्यावे. तसेच विम्याचा अर्ज आधार कार्डवरील नावाप्रमाणेच भरला जाईल, याची काळजी घ्यावी.

Crop Insurance
Agriculture Insurance : विमा भरतोय,भरपाईचे काय?

पण अजूनही काही नियम बदलण्याची आवश्यकता आहे. याची मागणी शेतकऱ्यांसह सर्वच जण केंद्राकडे करत आहेत. राज्य कृषी विभागानेही पीक विमा योनजेत काही बदल करण्याची शिफारस केंद्राकडे केली आहे. कारण पीकविमा योजना केंद्राच्या नियमानुसार चालते. त्यामुळे योजनेत बदल केंद्र सरकारच करू शकते.

राज्य शासनाने मागील वर्षापासून शेतकऱ्यांसाठी एक रुपयात विमा सुरु केला. म्हणजेच शेतकऱ्यांचा विमा हप्ताही राज्य सरकार भरत आहे. विमा योजनेत शेतकऱ्यांना पेरणी होऊनच शकली नाही तर भरपाई मिळते. पावसात मोठा खंड पडला आणि उत्पादकेतवर परिणाम झाला तर २५ टक्के अग्रीम भरपाई मिळते. अतिवृष्टी, गारपीट यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून भरपाई मिळते. पिकाची काढणी करून वाळवण्यासाठी शेतात ठेवलेले असताना नुकसान झाल्यास काढणी पश्चात नुकसान नुकसान भरपाई मिळते आणि शेवटी पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई दिली जाते.

Crop Insurance
Kharif Crop Insurance : खरिपाची ७१५० कोटी विमा भरपाई मंजूर

मागच्या वर्षी या सर्व टप्प्यांमधून शेतकऱ्यांना विक्रमी ७ हजार १४९ कोटी रुपये विमा भरपाई मिळाली. यापैकी ४ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले. उरलेले लवकरच मिळणार आहेत. यंदाही आपल्यासाठी पीकविमा खूपच गरजेचा आहे. कारण यंदा चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. त्यातच ऑगस्टनंतर ला निना परिस्थितीमुळे चांगला पावसाचा अंदाज आहे. म्हणजेच आपली खरिपातील पीकं काढणीच्या काळातच पाऊस वाढण्याची शक्यता आहे. या काळात आपली मूग, उडीद, सोयाबीन, मका, कापूस पिकाची काढणी सुरु होते. त्यामुळे या पिकांचे नुकसान होऊ शकते. नुकसान झाल्यास विमा भरपाई मिळून आपल्याला आर्थिक आधार मिळेल. त्यासाठी विमा अर्ज भरावा लागेल.

सध्या विमा योजनेचे अर्ज भरण्याचे काम सुरु आहे. १५ जुलै शेवटची तारिख आहे. आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांचे १ कोटी ३ लाख अर्ज प्राप्त झाले आहे. मागीलवर्षी राज्यातील शेतकऱ्यांनी १ कोटी ७० लाख अर्ज भरले होते. शेतकऱ्यांनी आपले पीक विमा संरक्षित करण्यासाठी तातडीने विमा अर्ज भरावा. तसेच विमा भरताना सीएससी केंद्रांना केवळ १ रुपयाच द्यावा. जादा पैशांची मागणी केल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी, असा आवाहन कृषी आयुक्तालयाने केले आहे.

नावातील बदलाचा मुद्दाही खूप चर्चेला जात आहे. याविषयी आपण यापुर्वीही माहिती दिली होती. विमा अर्ज भरताना आधार कार्ड आणि बॅंक खात्यावरील नाव सारखे असावे. पण सातबारावरील नावात थोडासा फरक असला तरीही चालेल. म्हणजेच बाळू ऐवजी बाळासाहेब, सरला ऐवजी सरलाबाई, कासिम ऐवजी काशीम असे नावातील थोडेफार बदल चालतील. म्हणजेच या बदलातून नाव तेच आहे याची कल्पना येते.

पण नाव पूर्णतः वेगळे नसावे. म्हणजेच विजय ऐवजी अजय आडनाव शिंदे ऐवजी जाधव असा बदल असेल तर विमा अर्ज नाकारले जातील. काही वेळा सातबारावर आडनावाची नोंद नसते. तर परिस्थितीत विमा अर्ज तर स्विकारले जातील. पण क्वाॅलिटी चेकच्या वेळी ही जमिन तुमचीच आहे त्याचा पुरावा जोडावा लागेल. ही सगळी माहीती लक्षात ठेऊन तातडीने विमा योजनेत सहभागी होऊन आपले पीक विमा संरक्षित असे आवाहन कृषी आयुक्तालयाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com