Kolhapur District Dam agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur District Dam : कोल्हापूर जिल्ह्यात धरणांमध्ये फक्त ८८ टक्के पाणीसाठा, प्रशासन सतर्क

Kolhapur Irrigation Department : जिल्हा पाटबंधारे विभागाने करवीर तालुक्यातील अनेक प्रकल्पांवर शेतीसाठी उपसाबंदी लागू करण्यात आली आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Dams Condition : राज्यात यंदा सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने अनेक जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याची कमतरता आतापासूनच भासत आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक धरणांचीही अशीच स्थिती असल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात लहान आणि मोठ्या धरणांमध्ये सध्या ८८ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे समजते आहे. दरम्यान पुढचे ७ महिने पाणी पुरेल यासाठी जिल्हा प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे.

खरिपानंतर रब्बी पेरणीला वेग आला परंतु पेरण्यास करण्यासाठी पाण्याची प्रचंड मागणी वाढल्याने जिल्हा प्रशासनाने पाणी पुरवण्यासाठी आतापासून कंबर कसली आहे. काल जिल्हा पाटबंधारे विभागाने करवीर तालुक्यातील अनेक प्रकल्पांवर शेतीसाठी उपसाबंदी लागू करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात काळम्मावाडी, राधानगरीसारखे ४ मोठे प्रकल्प आहेत तर ५६ मध्यम लहान धरणे आहेत. मागच्या वर्षी याच धरणांमध्ये ८७ टक्के पाणीसाठा होता तो यंदा ८८ टक्के आहे परंतु मागच्या वर्षीच्या तुलनेत काही धरणे १०० टक्के भरली नसल्याने प्रशासन भविष्यातील खबरदारी म्हणून उपसाबंदी करत आहेत.

याबाबत कोल्हापूर ताराबाई पार्कातील पाटबंधारे कार्यालयात आज (ता.०१) शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता इरिगेशन फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत उन्हाळ्यात शेती तसेच पिण्यासाठी पाणी कमी पडू नये, यासाठी आत्तापासून उपसाबंदी करण्यासंबंधी चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली.

या धरणातील पाण्यावर यंदा उसाचे क्षेत्र कमी करा, असे आवाहन पाटबंधारे प्रशासनाने केले आहे. त्याच धरणावरून कोल्हापूर शहरासाठी थेट पाइपलाइन योजनेतून पाणीपुरवठा सुरू झाला आहे. यासाठीही मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत आहे.

सर्वच धरणांतून पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे. परिणामी मागणीनुसार पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी पुरविण्याचे आव्हान पाटबंधारे प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

प्रकल्पांतील सध्याचा कंसात गेल्यावर्षीचा पाणीसाठा टीएमसीमध्ये

राधानगरी ७.४८ (७.८६), तुळशी : २.८७ (३.३३), दूधगंगा : २१.१३ (१८.९२), वारणा : ३१.९ (३२.६), कासारी : २.६८ (२.४९), कडवी : २.२७, कुंभी : २.६४ (२.५१), पाटगाव : ३.६३ (३.५७), चिकोत्रा : १.२९ (१.५२), चित्री : १.८८ ( १.८५), जंगमहट्टी : १.२२ (१.१९), घटप्रभा : १.५६ (१.५५), जांबरे : ०.८२ (०.८२), आंबेओहोळ : १.२० (१.०१).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Poscast: तुरीचे भाव दबावात; सोयाबीनचे दर सुधारले; कापूस व पेरूची आवक कमी; दोडक्याला उठाव

Paddy Crop Damage: नाशिकमधील भात उत्पादक शेतकरी संकटात

Hawaman Andaj: पावसाचे वातावरण निवळण्याची शक्यता; राज्यातील अनेक भागात किमान तापमानात होतेय घट

Sugarcane Harvest: वहागावमध्ये शेतकऱ्यांकडून ऊसतोडीसाठी नियमावली

Kolhapur Sugar Factory: 'बिद्री' पाठोपाठ भोगावती कारखान्याकडून सर्वाधिक ऊसदर जाहीर, 'एफआरपी'पेक्षाही अधिक

SCROLL FOR NEXT