New Sugarcane Variety Bismil: 'बिस्मिल' या उसाच्या नवीन वाणाच्या आणखी चार राज्यांमध्ये लागवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. हे नवीन वाण उच्च उत्पादन देणारे असून, ते उत्तर प्रदेश ऊस संशोधन परिषद, शाहजहांपूर यांनी विकसित केले आहे. ज्याला आता आणखी चार राज्यांमध्ये लागवडीसाठी मंजुरी देण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले..याआधी केवळ उत्तर प्रदेशमध्ये लागवडीसाठी हे वाण प्रसारित करण्यात आले होते. आता या ऊस वाणाच्या हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये लागवडीसाठी केंद्रीय समितीने मंजुरी दिली आहे, अशी माहिती ऊस संशोधन परिषदेचे संचालक व्ही. के. शुक्ला यांनी दिली. .भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाअंतर्गत हे ऊस वाण विकसित करण्यात आले आहे. या वाणाला अधिकृतपणे 'कोशा' (कोइम्बतूर-शाहजहांपूर CoSha 17231) असे नामांकित करण्यात आले आहे..Sugarcane Farming: उसाला तुरे येण्याची कारणे अन् उपाययोजना.ऊस पिकांसाठी मोठा धोका असलेल्या लाल कूज (रेड रॉट) रोगासाठी हे वाण प्रतिरोधक आहे. त्याची सरासरी उत्पादन क्षमता प्रतिहेक्टर ८६.३५ टन एवढी आहे. तर साखर उतारा १३.९७ टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. या नवीन वाणामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढण्यास मदत होईल आणि साखर उत्पादनही वाढेल, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे..Sugarcane Crushing Season: कार्यक्षेत्रातील ऊस तोडीकडे कारखान्यांचे दुर्लक्ष.या ऊस वाणाचे बेणे आणि रोपे उत्तर प्रदेशच्या ऊसपट्ट्यातील सर्व ४२ जिल्ह्यांमध्ये आधीच वितरित करण्यात आली आहेत. त्याचे उत्साहवर्धक परिणाम दिसून आले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे..आयसीएआरने नुकतीच CoSha 17231ऊस वाणासह २५ पिकांच्या १८४ नव्या वाणांना मंजुरी दिली. यामुळे या वाणाचे वैज्ञानिक महत्त्व आणि संभाव्य प्रभाव अधोरेखित होतो, असे उत्तर प्रदेश ऊस संशोधन परिषदेतील तज्ज्ञांनी म्हटले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.