मंगेश तिटकारे, हेमंत जगतापशेती व्यवसायातील जोखीम कमी करण्यासाठी व शाश्वत बाजारभाव प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने गोदाम पावती योजनेत सहभागी होणे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने एक योग्य पर्याय असेल. जागतिक बँकेने शेतीमाल तारण व्यवसाय करताना वित्तपुरवठ्यासाठी वस्तूंचा किंवा शेतमालाचा तारण म्हणून वापर याबाबत संकल्पना विषद केली आहे. शेतीमाल तारण व्यवसाय करताना वस्तू किंवा शेतातील उत्पादनाचा तारण म्हणून वित्तपुरवठ्यासाठी वापर करण्यात येतो..शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने मध्यस्थांची साखळी कमी करण्यासाठी कृषी मूल्य साखळ्यांवर शासनाने अनेक वर्षांपासून कामकाज सुरू केले आहे. त्यावर आधारित विविध योजना व प्रकल्प सुरू केले आहेत. कृषी मूल्य साखळ्यांमध्ये ज्याप्रमाणे विविध पीक आधारित मूल्य साखळ्या आहेत, त्याप्रमाणे या मूल्य साखळ्यांमध्ये गोदाम व शीतगृह यांची मोठी भूमिका आहे..Warehouse Receipt Use: वित्तपुरवठ्यासाठी वस्तूंचा तारण म्हणून वापर.गोदाम आधारित मूल्य साखळीमध्ये गोदाम पावती व्यवसाय अत्यंत महत्त्वाचा असून समुदाय आधारित संस्थांच्या प्रगतीसाठी व प्रस्थापित कृषी मूल्य साखळ्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी हा अत्यंत योग्य मार्ग आहे. समुदाय आधारित संस्था म्हणजेच सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी व महिला बचत गटांचे फेडरेशन यांचेमार्फत व्यवसाय उभारणीच्या दृष्टीने अवलंब करण्यात येणाऱ्या विविध पर्यायांपैकी गोदाम पावती व्यवसाय करणे सद्यःस्थितीत योग्य उपाय असेल..शेती व्यवसायातील जोखीम कमी करण्यासाठी व शाश्वत बाजारभाव प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने गोदाम पावती योजनेत सहभागी होणे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने एक योग्य पर्याय असेल. जागतिक बँकेने शेतीमाल तारण व्यवसाय करताना वित्तपुरवठ्यासाठी वस्तूंचा किंवा शेतमालाचा तारण म्हणून वापर (वस्तू आधारित वित्त) याबाबत संकल्पना विषद केली आहे. .Warehouse Receipt System: गोदाम पावतीसाठी कायदेशीर चौकटीचे महत्त्व.शेतमाल तारण व्यवसाय करताना वस्तूंचा अथवा शेतातील उत्पादनाचा तारण म्हणून वित्तपुरवठ्यासाठी वापर करण्यात येतो.वेअरहाउस रिसीट सिस्टम (WRS) ही एक अशी प्रणाली आहे, की जी गोदाम चालकाला गोदाम पावत्या देण्यास अधिकार प्रदान करते. या गोदाम पावत्या त्यावर नमूद केलेल्या गुणवत्तेच्या आणि प्रमाणित शेतीमालाचा पुरावा असतो..वित्त पुरवठा करारसद्यःस्थितीत साठवणूक केलेल्या धान्याचा वापर शेतमाल तारण म्हणून करून वित्तपुरवठा करण्याव्यतिरिक्त, इतर प्रकारचे शेतीमाल (कमोडिटी) वित्तपुरवठा करार किंवा प्रकार आहेत, जे भविष्यातील (शेतीमाल कापणीपूर्व) शेतीमाल उत्पादनाचा वित्तपुरवठा करण्यासाठी तारण म्हणून वापर करतात..Warehouse Receipt: गोदाम पावतीसाठी कायदेशीर चौकटीचे महत्त्व.पीक पावत्या हा कापणीपूर्व वित्तपुरवठा साधनांच्या विविध प्रकारांपैकी एक प्रकार आहे. ज्याच्या आधारे शेतकऱ्यांना भविष्यातील पीक तारण कर्ज मिळू शकते. भारतामध्ये हे सर्व नवीन आहे. ब्राझीलमधील सीपीआर (सेडुला प्रोडक्टो रूरल) प्रणाली हे त्याचे चांगले उदाहरण आहे. जरी अशी प्रणाली फायद्याची असेल, तरीही त्यासाठी मोठ्या संख्येने पूर्वअटी आणि निकषांची आवश्यकता असते. कारण तारण हे तारणासाठी असते, जे कर्ज मंजूर करताना (भविष्यातील पीक) अस्तित्वात नसते. बँकांना अशा भविष्यातील पीक तारणांवर कर्ज देण्यास सोपे व्हावे यासाठी अनेक जोखमींचे व्यवस्थापन करणे आवश्यक असते. सहसा अशा प्रणालींना असे धोके कमी करण्यासाठी पीक विमा, शेतीमालाच्या किमतीशी निगडीत किंमत हेजिंग यंत्रणा इत्यादींची आवश्यकता असते..ब्राझीलमधील पीक पावत्यांचे बहुतेक लाभार्थी मध्यम आणि मोठे व्यावसायिक शेतकरी असतात. या सर्व पूर्वअटींसह, ब्राझीलच्या बाहेर पीक पावत्या फारशा वापरण्यात येत नाहीत. अलीकडेच पूर्व युरोप आणि मध्य आशियातील काही मोठ्या धान्य बाजारपेठांमध्ये पीक पावत्यांचा प्रचार करून शेतकऱ्यांमध्ये त्यांची प्रसिद्धी करण्यासाठी काही पथदर्शक प्रकल्प तयार करण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न झाले आहेत. भारतात ही संकल्पना रुजविण्यासाठी पीक पावती आधारित योजना अथवा प्रकल्पांची निर्मिती व अंमलबजावणी करण्याची गरज आहे..Warehouse Receipts: गोदाम पावतीमुळे वित्तपुरवठा संधी .कंत्राटी अथवा करार शेतीमध्ये मूल्य साखळी वित्तपुरवठा हा शेतमाल कापणीपूर्व वित्तपुरवठ्याचा आणखी एक प्रकार आहे. या प्रकारात दळणवळण, कम्युनिकेशन, उत्पादनाची उपलब्धता शोधण्यायोग्य सुविधा इत्यादी नवीन तंत्रज्ञानावर आधारित तरतुदी उपलब्ध असतात. या संकल्पनेत मोठे खरेदीदार लहान उत्पादकांच्या संपर्कात येतात आणि या लहान शेतकऱ्यांना कर्ज आणि इतर उत्पादने व सेवा प्रदान करण्यास सक्षम करतात. या प्रकारच्या वित्तपुरवठ्याचा वापर अनेक मूल्य साखळ्यांमध्ये केला जातो. या प्रकारात मोठा खरेदीदार शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी करण्यासाठी औपचारिक किंवा अनौपचारिकरीत्या करार करतो आणि त्यांना तांत्रिक साह्य, कृषी निविष्ठा, पिकांची देखरेख, किंमत निश्चितता इत्यादी सेवा देखील देतो. अशा परिस्थितीत, बँका अशा करारांना तारण म्हणून वापरून शेतकऱ्यांना वित्तपुरवठा करण्यास तयार असतात. करार मूल्य साखळी वित्त व्यवस्थांचे तीन मुख्य प्रकार आहेत:.अ) बँका मोठ्या खरेदीदाराला वित्तपुरवठा करतात, जे नंतर लहान शेतकऱ्यांना वित्तपुरवठा करतात, सहसा मोफत कृषी निविष्ठा देऊन शेतकऱ्यांकडून कृषी निविष्ठा खर्च वजा करून खरेदीदार शेवटी बँकेला कर्जाची परतफेड करतो.ब) बँका थेट मध्यस्थाद्वारे (ऑफ-टेकर) शेतकऱ्यांना वित्तपुरवठा करतात. जेव्हा शेतकरी खरेदीदाराला पिकांचे उत्पादन विकतो, तेव्हा खरेदीदार हाच कर्ज फेडणारा असतो, जो शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम वजा करून मध्यस्थाद्वारे बँकेला कर्ज रक्कम परत देतो.क) कर्ज चुकविण्याबाबत बँकेला अतिरिक्त सुरक्षा देण्यासाठी कर्ज घेणारा मध्यस्थ पहिल्या नुकसानाची आंशिक हमी किंवा जोखीम वाटा म्हणून जोखमीचा काही भाग स्वत:ला घेऊ शकतो..Warehouse Finance Receipt: गोदाम पावती वित्तपुरवठा विस्ताराची संधी .वित्तपुरवठ्याच्या इतर प्रकारांमध्ये मूल्य साखळी वित्तव्यवस्था देखील आहेत, ज्यामध्ये कृषी निविष्ठा पुरवठादार स्थानिक बँकेमार्फत शेतकऱ्यांना कृषी निविष्ठेच्या स्वरूपात वित्तपुरवठा करतो. शेतकरी खरेदीदाराला शेतीमाल उत्पादन देतो तेव्हा शेतकऱ्याचे कृषी निविष्ठा पुरविलेल्याचे पैसे कापले जातात. अशा योजनेचे उदाहरण युक्रेनमध्ये आढळून येते, जेथे कृषी निविष्ठा पुरवठादार बँकेला परतफेडीवर नुकसानाची हमी देखील देतो. मूल्य साखळी वित्तपुरवठ्यातील कदाचित सर्वात मोठा धोका म्हणजे करार मोडून अतिरिक्त विक्री, ज्यामध्ये शेतकरी त्यांचे पीक कापणीपूर्व वित्तपुरवठा करणाऱ्या खरेदीदाराव्यतिरिक्त दुसऱ्या खरेदीदाराला देतात आणि त्यामुळे मान्य केलेल्या वजावटीद्वारे कर्ज परतफेड करण्यास शेतकरी असमर्थ असतात. याकरिता खरेदीदाराकडून करार शेती करताना चांगले प्रामाणिक शेतकरी निवडले गेल्यास व खरेदीदाराने योग्यरीत्या करारात सहभागी शेतकऱ्यांवर नियंत्रण ठेवल्यास हा धोका कमी होऊ शकतो..सुव्यवस्थित आणि उत्तम मूल्यसाखळीची रचना उदाहरणार्थ, एकाच ठिकाणी प्रक्रिया, गुणवत्तेसाठी उत्तम दर, नाशिवंत शेतीमालाची योग्य विल्हेवाट अथवा शेतीमालासाठी योग्य साठवणूक सुविधा, उच्च-मूल्य बाजारपेठांशी जोडणी इ. बाबींमुळे ही संकल्पना यशस्वी होऊ शकते. पोल्ट्री, दुग्धजन्य पदार्थ, कापूस, साखर, मत्स्यपालन, फळे व भाज्या, मसाले, कॉफी आणि चहा यासारख्या उच्च-मूल्य असलेल्या नगदी पिकांमध्ये सुव्यवस्थित आणि एकसंध मूल्यसाखळ्या आढळतात. याच्याशी संबंधित काही उदाहरणे म्हणजे भारतातील दुग्धजन्य पदार्थ, कुक्कुटपालन आणि साखर वित्तपुरवठा, पश्चिम आफ्रिकेतील कापूस वित्तपुरवठा आणि दक्षिण आफ्रिकेतील फळे आणि भाजीपाला वित्तपुरवठा, अशी इतर अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात..भविष्यातील उत्पादनासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी औपचारिक किंवा अनौपचारिक करार आणि शेतमाल खरेदीची ऑर्डर वापरण्याव्यतिरिक्त, मूल्य साखळी वित्तपुरवठ्याचा आणखी एक प्रकार म्हणजे प्राप्त करण्यायोग्य किंवा रिसिव्हेबल वित्तपुरवठा. या प्रकारात, शेतकरी बँकांकडून खरेदीदाराने त्यांचे पीक विकत घेतल्यानंतर त्याला दिलेली पावती किंवा देयक जे (उदा., ३०, ६० किंवा ९० दिवसांत) नंतरच्या तारखेला पैसे देण्याचे आश्वासन अथवा हमी देते, त्याआधारे वित्तपुरवठा मिळवितात.अशा वित्तपुरवठ्याचा मुख्य धोका म्हणजे, खरेदीदार (सामान्यतः एक मोठी स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय कंपनी) भविष्यात शेतकऱ्याला पैसे देणार नाही असेही होऊ शकते, परंतु शक्यतो असे घडत नाही. बँकेच्या दृष्टिकोनातून, हे खरेदीदाराच्या क्रेडिट जोखमीच्या कमी-अधिक प्रमाणात आहे, जे शेतकऱ्याच्या क्रेडिट जोखमीपेक्षा खूपच कमी असते. परिणामी, प्राप्त करण्यायोग्य वित्तपुरवठ्यामुळे किंवा रिसिव्हेबल वित्तपुरवठ्यामुळे शेतकऱ्याच्या जोखमीचे खरेदीदाराच्या जोखमीत रूपांतर होते. अनेक देशांमध्ये उदाहरणार्थ चिली, चीन आणि मेक्सिको, अशा अनेक देशांमध्ये रिसिव्हेबल वित्तपुरवठ्याचे प्लॅटफॉर्म आहेत, जे विविध वित्तीय संस्थांना शेतमालाचे देयक आणि रिसिव्हेबल वित्तपुरवठ्यासाठी करण्यासाठी सेवा पुरवितात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.