Milk Rate Issue : दूधदरासाठी लढा सुरूच राहणार ः डॉ. नवले

Dr. Ajit Navle : दुधाला किमान ३४ रुपये हमी दर मिळावा, यासाठी अकोल्यात उपोषण केले.
Milk Rate
Milk Rate Agrowon

Nagar News : ‘‘दुधाला किमान ३४ रुपये हमी दर मिळावा, यासाठी अकोल्यात उपोषण केले. दूधदरप्रश्‍नी चर्चा करण्यासाठी व त्याबाबत प्रभावी तोडगा काढण्यासाठी अर्थमंत्री, दुग्धविकासमंत्री यांच्यासोबत बैठक घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्‍वासन दिल्याने बेमुदत उपोषण मागे घेतले आहे.

तरीही दूधदराचा प्रश्‍नी सुटत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील,’’ असा निर्धार किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केला. डॉ. नवले म्हणाले, ‘‘राज्यात दुधाच्या दरात कपात केली जात आहे. खासगी दूध संघचालक मनमानी करून शेतकऱ्यांची सामूहिक लूट करत आहेत.

Milk Rate
Kolhapur Milk Rate : कोल्हापूर जिल्ह्यातील १४५० दूध संस्थांवर होणार कारवाई, ५० लिटरपेक्षा कमी दूध संकलन

चार महिन्यांत सुमारे दहा रुपयांनी दर खाली आणले आहेत. असे असताना दुग्धविकासमंत्री अथवा शासन काहीच पावले उचलत नाही. त्यामुळे अकोले येथे बेमुदत उपोषण सुरू केले होते. तीन दिवसांनंतरही दुग्धविकासमंत्र्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने मी त्यांना पाठिंबा देत अन्नत्याग आंदोलन सुरू केले.

Milk Rate
Milk Rate : राज्यातील ३० टक्के दुधात भेसळ ; राधाकृष्ण विखे-पाटील

सातव्या दिवशी अर्थमंत्री, दुग्धविकासमंत्री यांच्यासोबत बैठक घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्‍वासन दिल्याने आम्ही आंदोलन मागे घेतले.’’ ‘‘दूध उत्पादकांची होणारी लूट अन्यायकारक आहे.

दुधातील भेसळ रोखण्यासह गाईच्या दुधाला किमान ३४ रुपये प्रतिलिटर दर मिळालाच पाहिजे, यासाठी दूध उत्पादकांचा लढा सुरुच राहणार आहे. दुष्काळ व नैसर्गिक संकटाने त्रस्त झालेल्या दूध उत्पादकांची लूट थांबवावी,’’ अशी मागणी डॉ. नवले यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com