Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : सात मध्यम प्रकल्पांत केवळ ४४ टक्के पाणी

Team Agrowon

Solapur News : पावसाळ्याला सुरुवात होऊन अडीच महिने लोटले. या कालावधीत सरासरी इतका पाऊस पडला. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांत केवळ ४४.०८ टक्के पाणीसाठा झाला असून ५६ लघु प्रकल्पांपैकी २९ प्रकल्पातील (तलाव) उपयुक्त पाणीसाठा शून्य आहे. तर सात गावांना १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यात अजुनही जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यास येत्या काळात जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न गंभीर बनू शकतो.

जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासूनच चांगला पाऊस पडला आहे. तर ऑगस्ट महिन्यात शुक्रवारपर्यंत सरासरीच्या १०६.२ टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्याची सरासरी एकूण १०७.५ मिलीमीटर आहे. तर ११४ मिलीमीटर पाऊस पडला आहे. सरासरीहून अधिक पाऊस पडूनही जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांत फक्त ४४.०८ टक्के जलसाठा झाला आहे.

सातही प्रकल्पांची एकूण पाणीसाठ्याची क्षमता २३०.९४ दशलक्ष घनमीटर आहे. परंतु या प्रकल्पांत एकूण ११६.५१ दशलक्ष घनमीटर जलसाठा झाला आहे. यातील एकमेव ढाळे पिंपळगाव प्रकल्पात १०० टक्के जलसाठा झाला आहे. तर बोरी प्रकल्पात १९.२७, एकरुखमध्ये ३१.२१ व मांगीत ३८.२१ टक्के पाणीसाठा झाला आहे. तसेच ५६ लघुप्रकल्पांत ४३ टक्के जलसाठा झाला असून २९ प्रकल्‍पातील उपयुक्त पाणीसाठा

शून्यावर आहे. तर दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील सात गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे मध्यम व लघुप्रकल्पांत पाणीसाठा व भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यायोग्य पावसाची गरज आहे.

तालुकानिहाय उंबरठा पातळीखाली पाणीपातळी असलेले लघु प्रकल्प

दक्षिण सोलापूर : रामपूर, हणमगाव, धुबधुबी, उत्तर सोलापूर : सोरेगाव, अक्कलकोट : गळोरगी, शिरवळवाडी, हंजगी, डोंबरजवळगे, भुरीकवठे, काझीकणबस, बोरगाव, घोळसगाव, सातनदुधनी, करमाळा : पारेवाडी, वडशिवणे, हिंगणी के., कोंढेज, कुंभेज, नेर्ले, सांगवी, सांगोला : अचकदाणी, मंगळवेढा : तळसंगी नवा, तळसंगी जुना, मारोळे, मोहोळ : पोखरापूर

धुबधुबीसह अनेक लघु प्रकल्पांची स्थिती चिंताजनक

शिरवळ (ता. दक्षिण सोलापूर) येथी धुबधुबी प्रकल्पासह अनेक लघु प्रकल्पांतील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. भोसे, मारोळी (ता. मंगळवेढा), घोळसगाव, सातनदुधनी (ता. अक्कलकोट) आदी प्रकल्पांचा यात समावेश आहे.

प्रकल्पनिहाय उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी

एकरूख ३१.२१

हिंगणी ६८.३८

दवळगाव २५.८७

मांगी ३८.९१

आष्टी ७१.२३

बोरी १९.२७

ढाळे पिंपळगाव ११.०८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

Sericulture : रेशीम शेतीसाठी तुतीच्या सुधारित जाती

Vegetables Market : कोल्हापूर बाजारात टोमॅटो दरात वाढ; कोथिंबीरचे अचानक दर घसरले, कांद्याची आवक वाढली

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

SCROLL FOR NEXT