Dam Water Discharge : धरणांतून पुन्हा विसर्ग सुरू

Rain Update : मागील दोन दिवसांपासून अनेक भागांत जोरदार पाऊस कोसळत आहे. राज्यातील ५५ मंडलांत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला.
Dan Water
Dan WaterAgrowon
Published on
Updated on

Pune News : मागील दोन दिवसांपासून अनेक भागांत जोरदार पाऊस कोसळत आहे. राज्यातील ५५ मंडलांत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. तर रविवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंत नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील घाटघर येथे सर्वाधिक २६० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश विदर्भातील जवळपास ४७ धरणांतून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

कोकणात मुसळधार पाऊस :

कोकणात मागील दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस पडत आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश पाऊस बरसत आहे. ठाण्यातील दहिसर, बेलापूर येथे ९६ मिलिमीटर, शहापूर, किनहवळी, डोळखांब ९१, रायगडमधील खोपोली येथे ९९ मिलिमीटर, तर तळोजे ९६, नेरळ ९४, कोलाड ९५, रत्नागिरीतील कोंडये, आबलोली येथे ९९ मिलिमीटर, तर तरवल ९८, गुहागर ९७, भांबेड ९६, पुनस ९३, पाली ९१ मिलिमीटर, सिंधुदुर्गमधील तळेरे, वालावल येथे ९९ मिलिमीटर, तर भुईबावडा ९५, देवगड ९४, पेंडूर ९२ मिलिमीटर, पालघरमधील मनवर ९३, विक्रमगड ९१ मिलिमीटर पाऊस पडला.

Dan Water
Rain News : पश्‍चिम विदर्भात पाऊस पुन्हा सक्रिय

त्यामुळे भात खाचरातून पाणी पुन्हा वाहू लागल्याने ओढे, आले भरून वाहत असून अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहे. काही नद्यांकाठच्या गावांतील नागरिकांना नदीत उतरू नये, अशा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे मोडकसागर, तानसा, विहार, तुलसी, मध्य वैतरणा, भातसा, अप्पर वैतरणा, बारावे, मोराबे, हेटवणे, धामणी, देवघर ही काही महत्त्वाची धरणे जवळपास भरली आहे. त्यामुळे या धरणांतून विसर्ग सोडण्यात येत आहे.

मध्य महाराष्ट्र, खानदेशात जोरदार

खानदेशात जवळपास अडीच महिन्यानंतर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील दोन दिवसांपासून धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत अतिवृष्टीसदृश पाऊस होत आहे. त्यामुळे शेतात चांगलेच पाणी साचल्याने भूजल पातळी वाढण्यास मदत होत आहे. या भागातील नद्याही प्रवाही झाल्याने धरणांतील पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. मध्य महाराष्ट्रात नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्‍चिमेकडील भागात जोरदार, तर उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. तर घाटमाथ्यावर जोरदार झाला आहे.

खानदेशातील धुळे जिल्ह्यातील विरदेल येथे ७९ मिलिमीटर, नंदुरबारमधील दाब, चुलवड येथे ९६ मिलिमीटर, जळगावमधील लासूर, हातेड येथे ९२ मिलिमीटर पाऊस पडला असून नाशिकमधील हरसूल, थानापाडा येथे ९९ मिलिमीटर, नगरमधील एरंडगाव येथे ५७ मिलिमीटर, पुण्यातील नसरापूर ९४ मिलिमीटर, साताऱ्यातील उंडाळे येथे ७० मिलिमीटर महाबळेश्‍वर ८०, सांगलीतील चरण येथे ७० मिलिमीटर पाऊस झाला.

तर कोल्हापुरातील आजरा, गवसे येथे ७७ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे नद्याच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने या भागातील धरणांतील पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे या भागातील जवळपास २५ ते ३० धरणांतून पाण्याचा विसर्ग पुन्हा कमीअधिक स्वरूपात सोडण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे भरत आल्याने जिल्ह्यातील तब्बल २० धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे मुठा, मुळा, भीमा, पवना, आरळा, इंद्रायणी, कऱ्हा, कुकडी, नीरा, घोड, हंगा या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस :

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागांत दमदार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असून शेतातून पाणी वाहते झाले आहे. तुर्काबाद येथे ६९ मिलिमीटर पाऊस पडला असून जालना, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. तर इतर अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्याने काही पिकांना दिलासा मिळत असला तरी मूग, उडीद पिकांना नुकसानकारक ठरत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. तर धरणक्षेत्रात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून असल्याने धरणांतील पाणीपातळी फारशी वाढलेली नाही.

Dan Water
Rain Update : बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांत दमदार पाऊस

विदर्भात मध्यम सरी :

विदर्भात पाऊस कमीअधिक प्रमाणात होत आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक आहे. तर बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत काही मंडलांत जोरदार पाऊस झाला असून अनेक मंडलांत हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे तूर, कापूस पिकांना दिलासा मिळत असून शेतातून पाणी वाहू लागल्याने अनेक नद्या भरून वाहत आहे. त्यामुळे धरणांतील पाणीपातळी वेगाने वाढत असल्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.

येथे पडला १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस :

रतनवाडी २२१, पांजरे १३०, भंडारदरा १९५, बलकुम, मुंब्रा, खारबाव १२२, नयाहडी १५३, चौक ११७, तळा, कुडाळ १००, देवळे १०९, देवरुख १०६, शिरगाव, बापर्डे १०१, पाटगाव १०५, वैभववाडी १११, भेडशी १०४, डहाणू, मालयण १००, कसा १०९, चिंचणी १३५, बोयसर १३८, तारापूर १३५, तलासरी १२९, झरी १४३, उंबरठाणा १८५, बाऱ्हे, मानखेड १४३, सुरगाणा १६६, ननाशी १५८, इगतपुरी १०४, पेठ १०६, जागमोडी १२०, आष्टे १३७, नवापूर १३३, नवागाव १२०, चिंचपाडा १९८, विसरवाडी १८७, खांडबारा १२७, ब्रह्मपुरी १०६, म्हसावद १२१, सोमवल १०१, खुंटामोडी ११८, तोरणमाळ १२१, मोलगी, वडफळी १६६, माले, मुठे १४७, कार्ला १६२, लोणावळा १२६, वेल्हा १४१, पानशेत १७७, बारव्हा १०८, शेगाव ११४, मिढाळा १३८, अक्कलकुवा १४८.

रविवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यात झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत ः कृषी विभाग)

कोकण : ठाणे ८७, धसई ७१, देहरी ८५, पडघा ८३, वसींड ८९, उल्हासनगर ७३, कुमभर्ली ७७, पनवेल, ओवले, कर्नाळा ८२, कर्जत ७०, कडाव ८०, कळंब ७९, कशेले ८३, वौशी ७०, कापरोली, जसइ ७५, पाली, आटोने, जांभूळपाडा, पेण ७३, हमरापूर ७५, माणगाव ७०, इंदापूर, निजामपूर ८१, रोहा, नागोठणे ७७, मेंढा ७८, दाभोळ ७०, भरणे ७३, मंडणगड, म्हाप्रळ, देव्हारे ८२, खेडशी ९०, पावस ८६, फसोप ७२, कोतवडे, मालगुंड ८३, कडवी ७५, मुरडव, माखजन ८९, फणसवणे ७५, कोंडगाव ८९, तुळसानी ७४, माभळ ७०, तेर्ये ७५, सौंदळ ८४, लांजा ८६, पडेल ७३, , मालवण ७५, आबेरी ७१, सावंतवाडी, बांदा ७२, आजगाव ८३, आबोली ८७, मडूरा ७७, शिरोडा ८७, वेतोरे ७९, नांदगाव ७७, माणगाव ७१, पिंगुळी ९०, येडगाव ८३, तळवट ८७, विरार ७४, कांचगड ७०, साइवन ८८, पालघर ७४, सफला, अगरवाडी ७४, कोंढला ७३, तलवड ८८

मध्य महाराष्ट्र : दळवट, बोरगाव ६७, गिरणारे ६२, उमराळे ६८, कोशिंबे ७९, कसबे वणी ६४, धारगाव ७७, कोहोर ६८, त्र्यंबकेश्वर ७३, वेळुंजे ८१, धुळे शहर, फागणे ६३, निजामपूर ६७, दहिवेल ६०, शिंदखेडा ७६, वर्शी ६४, नंदूरबार ८४, खोंडामळी, रनाळा ८०, धानोरा ७७, शनिमांडळ ७८, मंदाणे ८९, असलोद ८५, तळोदा ८३, बोरद ६७, प्रतापपूर ८३, खापर ८१, म्हसवड ६४, रिंगणगाव ७३, पारोळा, बहादरपूर ६४, चाळीसगाव ६९, बहाळ ७१, नेरी ६६, नगरदेवळा ९५, कजगाव ६२,धरणगाव ६६, पाळधी ७१, सोनवद ७०, पारनेर ५१, शेवगाव ५४, कोथरूड ६२, पौड, घोटावडे ७५, पिरंगुट ६२, भोलावडे ९१, आंबवडे, निगुडघर ७४, काले ९२, खडकाळा ८५, शिवणे ८५, आंबवणे ९४, आंबेगाव ८५, सरवडे ५५, गगनबावडा ७५, कडगाव ६१, चंदगड, नारंगवाडी, हेरे ५०.

मराठवाडा : नांदूर, विहामांडवा, मांजरी ६०, पैठण, आपेगाव, चिंचोली, करंजखेड ६४, महालगाव ६७, नागमठाण ६५, नेर ६०, तिर्थपूरी ६०, पांगरी ७२, रेवकी ७१, चिकलठाणा ४५, पानकनेरगाव ५०.

विदर्भ : देऊळगाव राजा शहर ५४, मलकापूर ६१, हिरडव ६६, हरीसळ ८२, धारणी, धुळघाट, सदरबुल्दी ७४, चिखलदरा ९०, सेमडोह ८०, टेंभूरसोंडा ७७, अचलपूर ६१, करजगाव ८१, यवतमाळ ५५, कापरा ७०, सावरगढ, मोहा ५५, मालखेड ७०, सारवडी ६१, मळेवाडा, नंद ५५, भिवापूर, कारेगाव ७२, कोंढा ९४, पवनी ५८, असगाव ७२, आमगाव ६०, विरली ५८, मासाळ ६७, मुल्ला ५३, बोधगाव देवी ५०, बेंबळ ५८, वरोरा ६७, खांबडा ७०, भद्रावती ५५, भिसी ५७, शंकरपूर ६०, मासाळ ७२, नागभिड ८२, मेंढा ७०, सावळी, विहाड ६५, बामणी ८८, अहेरी ५५, एटापल्ली ५०, जरावंडी ८८, देसाईगंज ६८, शंकरपूर ५२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com