Onion  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Seed Production: जळगाव जिल्ह्यात कांदा बीजोत्पादन क्षेत्र कमी

Onion Cultivation: जळगाव जिल्ह्यात कांदा बीजोत्पादनासंबंधीची कांदा बल्बची लागवड सुमारे दोन हजार हेक्टरवर आहे. काही भागात आगाप लागवड झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात कांदा बीजोत्पादनासंबंधीची कांदा बल्बची लागवड सुमारे दोन हजार हेक्टरवर आहे. काही भागात आगाप लागवड झाली आहे. अनेक खरेदीदार कंपन्यांनी दरांची हमी दिली आहे. शिवाय बियाण्यासाठी कांदा किंवा कांदा बल्बचा पुरवठा केला आहे.

२०२२-२३ मध्ये कांदा बीजोत्पादन क्षेत्र जिल्ह्यात सुमारे तीन हजार हेक्टरपर्यंत होते. यानंतर सतत लागवड कमी झाली आहे. कांदा लागवडीऐवजी काही शेतकरी कांदा बीजोत्पादनाकडे वळले होते. कांदा बीजोत्पादनासाठी काही कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. करार करून घेतले आहेत. त्यात विविध दरांत कांद्याचा किंवा कांदा बल्बचा पुरवठा लागवडीसाठी शेतकऱ्यांना कंपन्यांनी केला.

तसेच खरेदीची हमी दिली आहे. दरही लागवडीपूर्वी ठरवून घेतले आहेत. पण कांद्याचा बाजार अस्थिर आहे. नैसर्गिक समस्या असल्यामुळे कांदा बीजोत्पादनासंबंधीचे कमी होत आहे. यंदा लागवड सुमारे २०० ते ३०० हेक्टरने कमी होईल, असा अंदाज होता.

कारण कांदा दर तेजीत असून, कांदा बल्बचा पुरवठा महाग झाला आहे. कांदा बीजोत्पादनासंबंधी यावल, जळगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर आदी भागांत चांगला प्रतिसाद मिळत असतो. पण या भागात शेतकरी यंदा फारसे स्वारस्य दाखवीत नसल्याचे चित्र आहे.

लागवडीसाठी लाल कांद्याचा सर्वाधिक उपयोग

कांदा बीजोत्पादनासंबंधी प्रतिकिलो विविध दर खरेदीदारांनी ठरविले आहेत. बीजोत्पादनात काढणीसाठी यंत्रणा, मजूर उपलब्ध करून देण्याची हमीदेखील दिली आहे. तसेच खरेदी थेट जागेवर करण्याचे आश्‍वासन दिले आहे. काही खरेदीदारांनी खते, फवारणीसाठीची कीडनाशकेदेखील पुरविण्याची तयारी दाखविली.

हा खर्च सुरुवातीला कंपन्या करतील. नंतर हा खर्च कपात केला जाईल. सद्यःस्थितीत कांदा बीजोत्पादनासंबंधीची लागवड पूर्ण झाली आहे. गेल्या महिन्यातही काही शेतकऱ्यांनी लागवड केली. लागवडीसाठी लाल कांद्याचा सर्वाधिक उपयोग झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT