Onion Farming : दौंडमधील शेतकऱ्यांकडून कांद्याला मोठी पसंती

Farmer Preference on Onion : मागील वर्षी शेतकऱ्यांना गर्वी कांद्याला वर्षभर चांगला बाजारभाव मिळाला. या वर्षीदेखील कांद्याला चांगला दर मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कांदा लागवडीस पसंती दिली आहे.
Onion
Onion Agrowon
Published on
Updated on

Daund News : मागील वर्षी शेतकऱ्यांना गर्वी कांद्याला वर्षभर चांगला बाजारभाव मिळाला. या वर्षीदेखील कांद्याला चांगला दर मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कांदा लागवडीस पसंती दिली आहे.

परिणामी यंदा लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. दौंड तालुक्यात ६० ते ७० टक्के कांद्याच्या लागवडी पूर्ण झाल्या आहेत. दौंड तालुका हा उसाचा आगर म्हणून ओळखला जातो. परंतु सातत्याने शेतामध्ये उसाचे पीक घेतल्याने उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये मिश्र पीक घेऊन पीक पद्धतीमध्ये बदल केला आहे.

Onion
New Onion Variety : ८५ दिवसांत तयार होणाऱ्या कांद्याचा नवीन वाण विकसित

मागील वर्षी कांद्याला २० रुपयांपासून ८० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. यामुळे शेतकऱ्यांना एकरी किमान ४ ते ६ लाख रुपये मिळाले. तर काही शेतकऱ्यांना नोव्हेंबरमध्ये ६० ते ८० रुपयांपर्यंत प्रतिकिलोला बाजारभाव मिळाला. मागील वर्षी कांद्याला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी कांद्याच्या लागवडीमध्ये वाढ केली आहे.

Onion
Onion Cultivation : मजूरटंचाईसोबत भारनियमनाचे आव्हान; कांदा लागवड अडचणीत

जानेवारीअखेरपर्यंत कांदा लागवड सुरू राहणार आहे. परंतु चालूवर्षी लागवडीच्या मजुरीमध्ये वाढ झाली आहे. मजुरीत वाढ झाल्याने काहींनी ट्रॅक्टर यंत्राच्या साह्याने लागवड केली आहे. बदलत्या वातावरणामुळे लागवड केलेल्या कांद्यावर मुळकूज, पीळ, मावा अशा रोगांचा प्रार्दुभाव झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. मुळकूजमुळे काही शेतकऱ्यांना कांद्याची दुबार लागवड करावी लागत आहे. यामुळे आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकरी कांदा चाळीमध्ये साठवणूक करतात. परंतु कांदाचाळ करणे सर्वच शेतकऱ्यांना शक्य होत नाही. कृषी विभागाच्या वतीने कांदाचाळीसाठी ड्रॉ पद्धतीने निवड करून अनुदान दिले जाते. ते बांधण्यासाठी अनेक जाचक अटी घालण्यात आलेल्या आहेत. तसेच कांदाचाळ लवकर मंजूरही होत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना साठवणुकीसाठी अडचणी येत आहेत. शासनाने कांदाचाळीचे उद्दिष्ट वाढवून त्यामधील जाचक अटी रद्द कराव्यात.
संदीप नय्यर, प्रगतिशील कांदा उत्पादक शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com