Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Kharif Crop Insurance : अवेळी पावसामुळे अनेकवेळा हातातोंडाला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती असते. त्यामुळे पीकविमा देवून संरक्षण दिले जाते.

Team Agrowon

Sangli News : अवकाळी, अतिवृष्टी, दुष्काळाच्या पार्श्वभूमीमुळे खरीप हंगामातील विविध पिकांना विमाच्या संरक्षण दिले आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरिपात ८१ हजार ६८ शेतकऱ्यांनी पीकविमा घेत ४० हजार १२१ हेक्टरवरील पिकांना संरक्षित केले आहे. मात्र, शासनाने एक रुपया भरून पीकविमा योजना बंद केली आहे.

जिल्ह्यातील बहुतांश शेती ओलिताखाली आली आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागतो. अतिवृष्टी, पावसाचा खंड यामुळे पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळावी, यासाठी पीकविमा योजना सुरू केली आहे.

अवेळी पावसामुळे अनेकवेळा हातातोंडाला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती असते. त्यामुळे पीकविमा देवून संरक्षण दिले जाते. त्यासाठी शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत अर्ज करणे आवश्यक आहे.

निसर्गकोपाच्या संकटातून सावरण्यासाठी पंतप्रधान विमा योजनेला पसंती दिली जाते. गत वर्षी शासनाने शेतकऱ्यांना एक रुपया भरून पीकविमा योजना सुरू केली होती. त्यामुळे गत वर्षीच्या खरीप हंगामात ३ लाख ६१ हजार ४३९ शेतकऱ्यांनी पीकविमा घेत १ लाख ७६ हजार ७०० हेक्टरवरील पिकांना संरक्षण दिले होते.

यंदा शासनाने ‘एक रुपयात पीकविमा’ योजना बंद केली आहे. प्रत्येक पिकासाठी हेक्टरी रक्कम निश्चित केली आहे. त्यानुसार कृषी विभागाने विमा योजनेत सहभागी होण्यासाठी प्रचार आणि प्रसिद्धी केली होती. मात्र, शेतकऱ्यांनी विम्याकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे.

यंदा जिल्ह्यातील कर्जदार आणि बिगर कर्जदार ८१ हजार ६८ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. जत तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला आहे. अर्थात पीकविम्याची रक्कम वाढवली असल्याने शेतकऱ्यांनी पीकविमा घेण्यासाठी पुढाकर घेतला नसल्याचे चित्र आहे.

७ कोटी ३३ लाख अदा

गत वर्षीच्या खरीप हंगामात ३ लाख ६१ हजार ४३९ शेतकऱ्यांनी पीकविमा घेत १ लाख ७६ हजार ७०० हेक्टरवरील पिकांना संरक्षण दिले होते. निसर्गाचा लहरीपणा, अतिवृष्टी, पावसाचा खंड यामुळे पिकांचे नुकसान झाले होते. त्यानुसार संबंधित विभागाने पंचनामे पूर्ण करून त्याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर केला होता. त्यानुसार जिल्ह्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ७ कोटी ३३ लाखाचा विमा अदा केला आहे.

Crop Insurance

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Controversy: अटी, शर्तींचे जाळे टाकून शेतकऱ्यांची फसवणूक; कर्जमाफीवर विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

Farm Loan Waiver: यवतमाळमधील ४८ हजार शेतकरी कर्जमाफीपासून राहणार वंचित

MahaDBT Scheme: महाडीबीटीतून परभणीत २ हजार ४३१ शेतकरी लाभार्थी निवड

Soybean Cultivation: कमी पावसात सोयाबीन पेरणी आणि खताचे नियोजन कसे कराल?

Karvanda Fruit Value Addition: करवंदाच्या मूल्यवर्धनासाठी प्रक्रिया उद्योग उभारण्याची गरज

SCROLL FOR NEXT