Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Kharif Season Crop Insurance : नव्या नियमानुसार पीक कापणी प्रयोगातील उत्पादनानुसार शेतकऱ्यांना पीकविमा संरक्षित परतावा मिळणार आहे.
Published on

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील पेरणी केलेल्या एकूण ४६ लाख ८३ हजार ५८७ हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे १२ लाख ७७ हजार ९८९ हेक्टर क्षेत्रच विमा संरक्षित करण्याला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे.

नव्या नियमानुसार पीक कापणी प्रयोगातील उत्पादनानुसार शेतकऱ्यांना पीकविमा संरक्षित परतावा मिळणार आहे. आधीच्या पीकविमा पद्धतीतील बदलांमुळे शेतकऱ्यांचा आपल्या पिकांना विमा संरक्षण घेण्याकडे कल कमी दिसतो आहे.

Crop Insurance
Crop Insurance Scheme : पीकविमा योजनेत नाशिकचे १ लाख ६२ हजार शेतकरी

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात सर्वसाधारण ४९ लाख ७२ हजार ७२८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत सुमारे ४६ लाख ८३ हजार ५८७ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. पेरणी झालेल्या या क्षेत्रापैकी छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील १२ लाख २३ हजार ४६८ शेतकऱ्यांनी ९ लाख ९९ हजार ४५१ अर्जाद्वारे सुमारे ४ लाख ७३ हजार २८२.७१ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे.

Crop Insurance
Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत केवळ तीन लाख अर्ज

दुसरीकडे लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यांतील ९ लाख २२ हजार ३३२ शेतकऱ्यांनी १२ लाख ३० हजार २८४ अर्जाद्वारे सुमारे ८ लाख ४ हजार ७०७ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. शेतकऱ्यांना आपले पीक विमा संरक्षित करण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत आहे.

जिल्हानिहाय पीकविमा संरक्षित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर १,३४,९५४.१८

जालना १,१६,००३.४

बीड २,२२,३२५.१३

लातूर १,९४,३३८.४५

धाराशिव १,५३,४००.०६

नांदेड २,२२,४८१.६६

परभणी १,६६,३७४.६९

हिंगोली ६८,११२.३७

जिल्हानिहाय शेतकरी सहभाग

छत्रपती संभाजीनगर ५,५८,३९४

जालना २,९६,३२४

बीड ३,६८,७५०

लातूर ३३,८८०

धाराशिव २,८५,९३६

नांदेड १,५२,१३२

परभणी ३,५७,३६२

हिंगोली ९३,०२२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com