Crop Insurance: परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ६ लाख ७ हजारांवर अर्ज

Hingoli Agriculture: पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत विमा भरपाईच्या निकषातील बदल तसेच एक रुपया शेतकरी हिस्सा विमा हप्ता बंद केल्यामुळे यंदाच्या (२०२५) खरिप हंगामात पीकविमा अर्ज दाखल करण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी आहे.
Crop Insurance
Crop Insurance Agrowon
Published on
Updated on

Parbhani News: पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत विमा भरपाईच्या निकषातील बदल तसेच एक रुपया शेतकरी हिस्सा विमा हप्ता बंद केल्यामुळे यंदाच्या (२०२५) खरिप हंगामात पीकविमा अर्ज दाखल करण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी आहे.

मंगळवारी (ता.२९) सकाळपर्यंत परभणी जिल्ह्यातील २ लाख १४ हजार ६२० शेतकऱ्यांनी ४ लाख १७ हजार ५३७ अर्ज तर हिंगोली जिल्ह्यातील ९४ हजार ५९८ शेतकऱ्यांनी १ लाख ९० हजार २०७ अर्ज दाखल केले होते.या दोन जिल्ह्यातील ३ लाख ९ हजार २१८ शेतकऱ्यांनी पीकविम्याचे ६ लाख ७ हजार ७४४ अर्ज दाखल केले होते.

Crop Insurance
Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

यंदाच्या खरीप हंगामात परभणी व हिंगोली जिल्ह्यांत भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत पीकविमा योजना राबविली जात आहे. परभणी जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद,ज्वारी,बाजरी या  ७ पिकांना तर हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन,कपाशी, तूर, मूग, उडीद,ज्वारी या ६ पिकांचा  विमा योजनेत समावेश आहे.

Crop Insurance
Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

मंगळवारी  (ता.२९) सकाळ पर्यंत परभणी जिल्ह्यातील २ लाख १४ हजार ६२० शेतकऱ्यांनी ४ लाख १७ हजार ५३७ अर्ज  दाखल केले.एकूण २ लाख ७७ हजार २६० हेक्टरवरील पिकांसाठी १ हजार ५८१ कोटी ४७ लाख रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले.शेतकऱ्यांनी  स्वहिश्याचा ३० कोटी ५६ लाख २५ हजार रुपये विमा हप्ता भरला आहे.

शेतकरी,राज्य,केंद्र यांचा मिळून  एकूण २२१ कोटी ८३ लाख रुपये विमा हप्ता आहे.हिंगोली जिल्ह्यातील ९४ हजार ५९८शेतकऱ्यांनी १ लाख ९० हजार २०७ विमा प्रस्ताव दाखल केले आहेत.एकूण १ लाख १५ हजार ८७० हेक्टरवरील पिकांसाठी ६५६  कोटी ८९ लाख रुपयाचे विमा संरक्षण घेतले आहे.

शेतकऱ्यांनी १२ कोटी ६ लाख रुपये विमा हप्ता भरला आहे. शेतकरी, राज्य,केंद्र मिळून एकूण ९७ कोटी ८४ लाख रुपये विमा हप्ता आहे. इच्छुक शेतकऱ्यांना खरीप पीकविमा योजनेअंतर्गत विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी  ३१ जुलैपर्यंतची मुदत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com