Soybean Sowing Tips: यंदा एल निनोच्या प्रभावामुळे कमी पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. योग्य वाणांची निवड, वेळेवर पेरणी, योग्य अंतर आणि खत व्यवस्थापन केल्यास कमी पावसातही चांगले उत्पादन मिळू शकते..योग्य वाणांची निवडकमी पावसाच्या परिस्थितीत कमी किंवा मध्यम कालावधीत येणारे वाण निवडावेत. फुले दुर्वा (केडीएस-९९२), एमएयूएस-७२५, एमएयूएस-६१२, एएमएस-१००-३९, जेएस-२०-३४ आणि जेएस-३३५ हे वाण कमी पाण्याचा ताण सहन करण्यास मदत करतात..Soybean Cultivation Tips: कमी पावसात सोयाबीन लागवडीसाठी महत्त्वाच्या टिप्स.पेरणीपूर्वीसोयाबीनसाठी बी बी एफ किंवा सरी वरंबा पध्दतीची रानबांधणी फायदेशीर ठरते. त्यामुळे रुंद वरंबा सरीची रानबांधणी करुन घ्यावी. यावेळी चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी १० टन तसेच फुले ट्रायकोडरमा ५ किलो प्रती हेक्टरी मातीत मिसळावे..पेरणीची योग्य वेळपहिला पाऊस पडताच घाईने पेरणी करू नये. शेतात किमान ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतर आणि जमीन ६ इंचापर्यंत ओली झाल्यानंतरच पेरणी करावी. अपुऱ्या ओलाव्यात पेरणी केल्यास उगवण कमी होते आणि दुबार पेरणीची वेळ येऊ शकते..Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?.पेरणीचे अंतर आणि खोलीसोयाबीनची पेरणी साधारण ३ ते ५ सेंमी खोलीवर करावी. पेरणी खूप खोल केल्यास उगवण कमी होते. दोन ओळींमधील अंतर ४५ सें.मी. आणि दोन रोपातील अंतर ५ सें.मी इतके ठेवावे. यामुळे झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश, हवा आणि अन्नद्रव्ये मिळतात. बीबीएफ म्हणजेच रुंद वरंबा-सरी पद्धतीने पेरणी केल्यास पावसाचे पाणी जास्त काळ साठते आणि पिकाला अधिक दिवस ओलावा मिळतो..बीजप्रक्रिया आवश्यकपेरणीपूर्वी बियाण्याला बुरशीनाशक आणि जैविक खतांची प्रक्रिया करावी. कार्बोक्सिन ३७.५ टक्के अधिक थायरम ३७.५ टक्के हे बुरशीनाशक ३० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे या प्रमाणात वापरावे. त्यानंतर खोडमाशी व रसशोषक किडींपासून संरक्षण करण्यासाठी बियाण्याला थायमिथोक्ज़ाम ३० टक्के एफ एस हे कीटकनाशक १०० मिली प्रति १० किलो बियाण्याला चोळावे. त्यानंतर रायझोबियम आणि पीएसबी म्हणजेच स्फुरद विरघळवणारे जिवाणू प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्याला चोळावे. यामुळे मुळांची वाढ चांगली होते आणि नत्र उपलब्ध होण्यास मदत मिळते..खत व्यवस्थापनरासायनिक खतांचा वापर माती परीक्षणानुसार करावा. माती परीक्षण उपलब्ध नसल्यास शिफारशीनुसार खतांचा वापर करावा. पेरणीच्या वेळी हेक्टरी नत्र: स्फुरद: पालाशची ५०:७५:४५ किलो इतकी मात्रा द्यावी. तसेच हेक्टरी २० किलो गंधकाची अतिरिक्त मात्र द्यावी. पीक ३० ते ३५ दिवसाचे असताना फुले मायक्रोन्यूट्रिएन्ट ५ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारावे. पेरणीनंतर काही दिवसात पावसाचा खंड पडल्यास १९:१९:१९ किंवा १३:००:४५ या विद्राव्य खतांची १ ते २ टक्के फवारणी करावी. जेणेकरुन पिकाला ताण सहन करण्यास मदत होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.