Revenue Department  Agrowon
ॲग्रो विशेष

Revenue Department : धाराशिव ‘दुग्धविकास’ची एकरभर जागा ‘महसूल’कडे

Milk Dairy Land : कुर्ला दूध डेअरी, बोरिवलीतील पशुसंवर्धन विभागाच्या जागेचे हस्तांतर केल्यानंतर आता धाराशिव येथील एक एकर दूध शीतकरण केंद्राची जागा महसूल विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Team Agrowon

Mumbai News : कुर्ला दूध डेअरी, बोरिवलीतील पशुसंवर्धन विभागाच्या जागेचे हस्तांतर केल्यानंतर आता धाराशिव येथील एक एकर दूध शीतकरण केंद्राची जागा महसूल विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महसूल तथा पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर दुग्धविकास व पशुसंवर्धन विभागाच्या जागा हस्तांतरित करून महसूल विभागाकडे घेण्याचा सपाटा लावला आहे. कुर्ला येथील तब्बल २० हजार कोटींची जमीन अदानी समूहाला देण्यात आली आहे. ही जागा नाममात्र दरात देण्यात आली आहे. कुर्ला दूध डेअरीतील कामकाज सध्या ठप्प असल्याचे सांगत सरकार या व्यवसायातून बाहेर पडण्याचा विचार करत असल्याचे सरकार दुग्ध व्यवसायातून बाहेर पडत असल्याचे सांगत आहे. त्यामुळेच या जागांचा बाजार केला जात आहे.

काही दिवसांपूर्वी पशुवैद्यकीय महाविद्यालयाची बोरिवली येथील तीन एकर जागा मुंबै बँकेच्या सहकार भवनाच्या बांधकामासाठी देण्याचा शासन आदेश पशुसंवर्धन विभागाने काढला होता. मात्र हा आदेश संकेतस्थळावरून काढून टाकावा, यासाठी मंत्री कार्यालयातून यंत्रणा हलली आणि तो आदेश संकेतस्थळावरून हटवला. मात्र मुंबई आणि मुंबई उपनगरातील कोणताही भूखंड हस्तांतरित करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात. त्यामुळे या फाइलवर सही न होताच भूखंड हस्तांतरित केल्याचे समजते.

आदेश काढण्याची घाई

भूखंड हस्तांतरित न होताच त्याचा शासन आदेश काढण्याची घाई पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाला लागली होती. यानंतर आता धाराशिव येथील दुग्ध व्यवसाय विभागाच्या अखत्यारित असलेल्या शासकीय दूध शीतकरण केंद्रांची एक एकर जागा साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी द्यावी,

अशी मागणी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी २३ मे २०२३ रोजी, तर दुग्ध व्यवसाय विभागाच्या आयुक्तांनी ३० जुलै रोजी केली होती. त्यावर तातडीने कार्यवाही करत ही जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ही जागा तातडीने महसूल विभागाकडे हस्तांतरित करावी, असे आदेशही काढले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT