Revenue Department : तलाठ्याच्या पदभारासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

In charge of Talathi : उपविभागीय अधिकाऱ्यांनी दुसऱ्या मंडळातील तलाठ्याला पदभार दिल्यानंतरही त्यांनी अतिरिक्त पदभाराबाबत असलेल्या एका शासन निर्णयाला खुंटीला बांधून ठेवल्याची चर्चा घडून आली.
Talathi Office
Talathi Office Agrowon
Published on
Updated on

Latur News : जिल्हा तलाठी महासंघात दोन गट पडल्याने त्याचा परिणाम महसूल विभागाच्या कामकाजावर होत असून एका तलाठ्यांचा अतिरिक्त पदभार दुसऱ्याला देण्यासाठी प्रशासनाची दमछाक होत आहे. यातूनच आर्वी (ता. लातूर) या महत्त्वाच्या सज्जाचा पदभार देताना तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांना आग्रह धरावा लागला. उपविभागीय अधिकाऱ्यांनी दुसऱ्या मंडळातील तलाठ्याला पदभार दिल्यानंतरही त्यांनी अतिरिक्त पदभाराबाबत असलेल्या एका शासन निर्णयाला खुंटीला बांधून ठेवल्याची चर्चा घडून आली.

प्लॉट विक्रीसह बेकायदा वाळू व मुरूम वाहतुकीमुळे शहर व शहराभोवतीच्या गावाचे सज्जांसाठी तलाठ्यांमध्ये नेहमीच स्पर्धा असते. कधी प्रतिनियुक्ती तर कधी बदलीने अनेक तलाठी एकाच सज्जावर वर्षानुवर्षे काम करताना दिसत आहेत. या ठिकाणी दुसऱ्याची ते डाळ शिजू देत नसल्याचेही चर्चा होते. या ठिकाणी दरवर्षी तलाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चलती होते व पदाधिकारी नसलेल्या तलाठ्यांना दूरच्या सज्जांवर काम करावे लागते.

Talathi Office
Talathi Transfer : तलाठ्यांच्या बदल्या ऑनलाइन होणार

वर्षानुवर्षे संघटनेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांत सुसंवादाच्या सुरसकथा सुरू आहेत. गेल्या महिन्यात संघटनेतही फूट पडून दोन गट झाले तर पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्येही वादाची ठिणगी पडली. एका अधिकाऱ्यांने पदाधिकाऱ्यांपासून चार हात दूर राहण्यास सुरवात केल्यानंतर दुराव्याचा फायदा घेत दुसरे अधिकारी पुढे आले व ते तालुक्यावर एकहाती वर्चस्व स्थापन करण्यात यशस्वी झाले. आर्वी सज्जाचा पदभार देण्यावरून चांगलेच राजकारण झाले.

Talathi Office
Kolhapur Talathi Bribe : शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या तलाठ्याला एलसीबीने पकडलं रंगेहाथ

आर्वीचे तलाठी गिरीश डोईफोडे हे १७ मे ते १९ सप्टेंबर दरम्यान प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर त्यांचा पदभार लातूर - ३ चे तलाठी विलास कतलाकुटे यांना दिला. त्यावर तलाठी संघटनेच्या एका गटाने आक्षेप घेतला. हा वाद विकोपाला जाऊन अधिकारी व पदाधिकाऱ्यांत बाचाबाची झाली. यामुळे तहसीलदारांनी आर्वीचा पदभार अन्य तलाठ्यांकडे सोपवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस केली. यात शासन निर्णयानुसार अतिरिक्त पदभारासाठी पात्र त्यांनी तीन तलाठ्यांची नावेही सुचवल्याचे सांगण्यात येते.

शिंदे यांच्याकडे अतिरिक्त पदभार

तलाठ्याच्या अतिरिक्त पदभाराच्या क्षुल्लक गोष्टीत हस्तक्षेप न करता जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना यावर निर्णय घेण्याची सूचना केली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे यांनी कन्हेरीचे तलाठी दत्ता शिंदे यांच्याकडे हा पदभार सोपवला. यात तहसीलदारांनी अतिरिक्त पदभारासाठी पात्र ठरवलेल्या तीनपैकी एकाही तलाठ्याची निवड झाली नाही. तसेच महसूल मंडळात पात्र तलाठी असताना दुसऱ्या मंडळातील तलाठी शिंदे यांना पदभार देऊन नऱ्हे यांनी शासन निर्णयातील तरतुदीचे पालन केले नसल्याची चर्चा घडून आली. दरम्यान अतिरिक्त पदभार देताना शासन निर्णयाचे पालन केल्याचे नऱ्हे यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com