Revenue Department : कामकाजात अद्ययावत तंत्रज्ञानाचा अंगीकार करा

IAS Dilip Swami : अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वतः अद्ययावत राहून नव तंत्रज्ञानाचा व संकल्पनांचा अवलंब करा व नागरिकांना तत्पर व बिनचूक सेवा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
IAS Dilip Swami
IAS Dilip Swami Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वतः अद्ययावत राहून नव तंत्रज्ञानाचा व संकल्पनांचा अवलंब करा व नागरिकांना तत्पर व बिनचूक सेवा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

महसूल पंधरवडा १ ते १४ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येत आहे. महसूल दिनानिमित्त गुरुवारी (ता. १) या पंधरवड्याच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आला.

IAS Dilip Swami
Veterinary College : खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेविरोधात विद्यार्थ्यांचा संप

अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, अपर जिल्हाधिकारी मंदार वैद्य, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी अर्चना खेतमाळीस, डॉ. सुचिता शिंदे, एकनाथ बंगाळे, रामदास दौड, प्रवीण फुलारी, डॉ. व्यंकट राठोड, अपर तहसीलदार विजय चव्हाण यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

महसूल पंधरवड्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून या १५ दिवसांत विविध उपक्रमांतून महसूल विभाग लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

IAS Dilip Swami
Milk Rate : तीस रुपये दर न देणाऱ्या दूध संकलन केंद्रावर कारवाई

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, की महसूल विभाग हा नेहमीच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करत असतो. हे करत असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी. विविध उपक्रमाच्या माध्यमातून विरंगुळा आणि सुख दुःख समजून घेण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.

महसूल विभागात काम करत असल्याचा अभिमान आणि स्वाभिमान कर्मचाऱ्यांना असावा. मनातील संकुचितपणा सोडून आपले कर्तव्य बजावण्यासाठी प्रत्येकाचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com