Animal Ambulance Agrowon
ॲग्रो विशेष

Livestock Health Service: जनावरांना जागेवरच उपचाराने पशुपालकांना दिलासा

Veterinary Services: शेतकऱ्यांच्या पशुधनाला थेट गोठ्यातच उपचार मिळावेत यासाठी फिरत्या पशुचिकित्सालयाद्वारे पशुसेवा मिळणार आहे. यासाठी मुख्यमंत्री स्वास्थ्य योजनेअंतर्गत ३२९ फिरती पशू चिकित्सालये (ॲम्ब्युलन्स) मंजूर केली आहेत.

Team Agrowon

Pune News: शेतकऱ्यांच्या पशुधनाला थेट गोठ्यातच उपचार मिळावेत यासाठी फिरत्या पशुचिकित्सालयाद्वारे पशुसेवा मिळणार आहे. यासाठी मुख्यमंत्री स्वास्थ्य योजनेअंतर्गत ३२९ फिरती पशू चिकित्सालये (ॲम्ब्युलन्स) मंजूर केली आहेत. त्यापैकी ८० चिकित्सालये प्रत्यक्ष कार्यरत असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिली.

डॉ. देवरे म्हणाले, की मुख्यमंत्री १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत पशुधनाच्या स्वास्थ्यावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. पशुधन निरोगी असेल, तर शेतकरीदेखील निश्‍चित असतो. शेतकरी आणि पशुपालकांना पशुधनावर उपचार करण्यासाठी प्रवास करावा लागू नये, किंवा पशुधनाची वाहतूक करावी लागू नये यासाठी फिरती चिकित्सालये सुरू करण्यात आली आहेत. पशुधन आजारी पडल्यावर वाहतुकीसाठी मोठा खर्च ग्रामीण भागातील पशुपालकांना करावा लागतो.

हा खर्च, वेळ आणि मनस्ताप कमी होण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. या चिकित्सालयामध्ये अत्याधुनिक यंत्रणा, औषधोपचारांची साधने आणि दोन पशुवैद्यकीय अधिकारी आणि तंत्रज्ञांचा समावेश असतो. यासाठी १९६२ या टोल फ्री (निःशुल्क) क्रमांकाची देखील व्यवस्था केली आहे.

शेतकऱ्यांनी त्यांच्या पशुधनाच्या आजाराची माहिती या क्रमांकावर नोंदविल्यावर थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यावर उपचारासाठी हे वाहन जात आहे. सध्या ३२९ फिरती चिकित्सालये मंजूर असून, ८० कार्यान्वित आहेत.

प्रत्येक पशुधनाला आरोग्य उपचार मिळावे, यासाठी थेट गोठ्यापर्यंत वैद्यकीय सेवा देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. याअंतर्गत आता ८० चिकित्सालये कार्यान्वित झाली असून, उर्वरित लवकरच कार्यान्वित होतील. एक लाख पशुधनामागे एक फिरते चिकित्सालय असे धोरण असून, याद्वारे पशुधनाला जास्तीत जास्त आधुनिक उपचारांद्वारे निरोगी ठेवण्याचे पशुसंवर्धन विभागाचे धोरण आहे.
डॉ. प्रवीणकुमार देवरे, पशुसंवर्धन आयुक्त, महाराष्‍ट्र राज्य

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT