Veterinary Hospitals: पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या दुपटीने वाढणार

Rural Development: राज्यातील पशुधनाच्या आरोग्यसेवेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला असून, २०५३ नव्या ‘अ वर्ग’ पशुवैद्यकीय दवाखान्यांची उभारणी केली जाणार आहे. या सुविधांमुळे शेतकऱ्यांच्या गोठ्यांपर्यंत थेट शस्त्रक्रिया, प्रयोगशाळा व एक्सरे सेवा पोहोचणार आहेत.
Veterinary Services
Veterinary ServicesAgrowon
Published on
Updated on

Pune News: राज्यातील पशुधनाला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी नव्याने २ हजार ५३ अ वर्ग पशुवैद्यकीय दवाखाने उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखान्यांची एकूण संख्या ४ हजार ८५३ होणार असून, या दवाखान्यांमार्फत थेट गोठ्यापर्यंत वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिली.

डॉ. देवरे म्हणाले, ‘‘राज्यात पशुपालन हा शेतीला समांतर व्यवसाय आहे. शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधणारे हे माध्यम आहे. पशुधन निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमात पशुवैद्यकीय सेवा सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्या नुसार जुन्या पशुवैद्यकीय दवाखान्यांचा आणि सेवांचा दर्जा वाढविण्याचे ठरविले होते. त्यानुसार आता सर्वच पशुवैद्यकीय दवाखाने अ वर्ग करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

Veterinary Services
Veterinary Services : पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कामाची ॲपद्वारे नोंद

यानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या २ हजार ८०० दवाखान्यांच्या बळकटीकरणासह नव्याने २ हजार ५३ दवाखाने उभारण्यात येणार आहेत. या साठी सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदांना पत्रव्यवहार केला आहे. संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समितीमधून नव्याने बांधण्यात येणाऱ्या दवाखान्यांसाठी ६० लाखांचा, तर दुरुस्तीसाठी ३० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.’’

...असे असणार पशू वैद्यकीय चिकित्सालय

पशुवैद्यकीय सेवा अत्याधुनिक करण्यासाठी पशू चिकित्सालयांमध्ये शस्त्रक्रिया कक्ष, प्रयोगशाळा, एक्सरे सेवा आदींची सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच फिरती चिकित्सालयेदेखील असणार असून, आपत्कालीन आणि गुतांगुतीच्या उपचारासाठी थेट गोठ्यापर्यंत वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. विविध जिल्ह्यांनी पशुसंवर्धन आयुक्तालयाला कळविल्याप्रमाणे नवीन आणि दुरुस्तीसाठी केलेली तरतूद. उर्वरित जिल्ह्यांची माहिती संकलनाचे काम सुरू आहे.

Veterinary Services
Akola Veterinary College : महाविद्यालय पशुधनाला संजीवनी देणारे ठरेल

जिल्हानिहाय तरतूद निधी (कोटी रुपयांत)

जिल्हा --- नव्या दवाखान्यांसाठी निधी--- दुरुस्तीसाठी निधी

पुणे --- ५ --- २.५

सातारा --- ४.५ --- ५.५

सांगली ---५.५ --- ३

सोलापूर --- ५.५ --- ४.५

नव्याने २ हजार ७९५ पशुवैद्यकीय अधिकारी होणार उपलब्ध

पशुवैद्यकीय चिकित्सालयांसोबत पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही संख्या २ हजार ७९५ एवढी असून, महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्या मुलाखती सुरू होऊन, ६ महिन्यांत सर्व पशुवैद्यकीय अधिकारी रुजू होतील, असेही डॉ. देवरे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com