
Nashik News : जिल्हा परिषद नाशिकच्या पशुसंवर्धन विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून पशुवैद्यकीय सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी ‘ई पशू’ ॲपची निर्मिती केली असून जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते या ॲपचे अनावरण करण्यात आले.
ॲपचे अनावरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.अर्जुन गुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. बी. आर. नरवाडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे तसेच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी,ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी ई पशू ॲपमुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतिमान होणार असून पेपरलेस कामकाजामुळे वेळेची बचत होऊन तांत्रिक कामकाज अधिक प्रभावीपणे हाताळता येणार असल्याचे सांगत पशूंच्या कल्याणासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत केली जात असल्याचे नमूद केले.
तसेच जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र ‘मिशन कामधेनू’ योजना सुरू करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात ६०दवाखान्यांचे नूतनीकरण पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. डॉ. गुंडे यांनी पशुसेवेचे महत्त्व स्पष्ट करत ई पशू ॲपमुळे ही सेवा अधिक सोपी आणि जलद होईल असे मत व्यक्त केले.
संबंधित ॲप पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांसाठी, पशुपालक व विभाग प्रमुखांसाठी उपयुक्त ठरणार असून जिल्ह्यातील दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवण्याबरोबरच पशूंमध्ये आजारांचे प्रमाण आणि रोगप्रसारावर वेळीच नियंत्रण ठेवता येणार आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण २४४ पशुवैद्यकीय संस्था कार्यरत असून, या ॲपच्या मदतीने त्यांच्या दैनंदिन सेवांची नोंद डिजिटल स्वरूपात ठेवली जाणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन राजपत्रित पशुवैद्यक संघटनेचे अध्यक्ष डॉ. चांदोरे, डॉ.भगवान पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. योगेश मेहेरे आणि डॉ. ज्ञानेश्वरी भांड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. रवींद्र चांदोरे यांनी केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.