Farmer ID Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Visit : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे बांधावरच शंका समाधान

Agri Officer's On Farm : या उपक्रमात ‘‘अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावरी’’ या उपक्रमा अंतर्गत विविध प्रकारच्या तक्रारीचे शंका समाधान आणि निराकरण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेले आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शंका समाधान, बी बियाणे, खते त्याचप्रमाणे पीककर्ज प्रक्रिया, शेतरस्ता, इत्यादी विषयावरील तक्रारीवरील शंका, समाधान करण्यासाठी प्रत्येक विभागातील अधिकारी सोमवारपासून (ता. 23) शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे.

तालुका निहाय केलेल्या नियोजनासाठी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी गावनिहाय होणाऱ्या भेटीचे नियोजन व त्याचे अहवाल याचे सादरीकरण जिल्हास्तरावर करण्याबाबतही निर्देशित करण्यात आले आहे. सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत विविध विभागाचे अधिकारी, शेतकऱ्यांच्या गावात, शिवारात आणि बांधावर जाऊन भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

या उपक्रमात ‘‘अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावरी’’ या उपक्रमा अंतर्गत विविध प्रकारच्या तक्रारीचे शंका समाधान आणि निराकरण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेले आहे. यामध्ये महसूल, ग्रामविकास, कृषी विभाग, भूमी अभिलेख, विविध बँकांचे प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे.

या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या अडीअडचणी कार्यालयात घेऊन येण्याऐवजी प्रत्यक्ष त्यांच्याकडेच जाऊन त्यांच्या बांधावर अधिकाऱ्याने अडचणी सोडवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या शेत रस्ता, इतर सुविधा, मालकी हक्क, फेरफार, खत, बी बियाणांची उपलब्धता याविषयी संवाद साधला जाणार आहे. यामध्ये महसूल, कृषी ग्रामविकास, सहकार, भूमी अभिलेख, वन विभाग विभागाचे सर्व अधिकारी तालुका निहाय नियोजन करून किमान प्रत्येकी १० शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी देणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Anti Corruption: विहिरीच्या नोंदीसाठी लाच मागणारा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात 

Farmer Compensation: भरपाईतही नव्या दरामुळे फटका

Leopard In Solapur: बिबट्यांची संख्या पन्नास की शंभर?

White Grub Infestation: हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाचे वरातीमागून घोडे

Onion Farmers: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT