Anti Corruption: विहिरीच्या नोंदीसाठी लाच मागणारा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात 

Bribery Case: विहीर, बोअरवेल नोंदीसाठी लाच मागणारा भूमिअभिलेखचा लिपिक शंकर अरुण बजबळकर (वय ३०, रा. तिप्पेहळळी, ता. सांगोला) आणि रिक्षा चालक सूरज रवींद्र सर्वगोड (रा. हौसेवस्ती, मरिआई चौक, देगाव रोड, सोलापूर) यांच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
Anti Corruption
Anti CorruptionAgrowon
Published on
Updated on

Solapur News: विहीर, बोअरवेल नोंदीसाठी लाच मागणारा भूमिअभिलेखचा लिपिक शंकर अरुण बजबळकर (वय ३०, रा. तिप्पेहळळी, ता. सांगोला) आणि रिक्षा चालक सूरज रवींद्र सर्वगोड (रा. हौसेवस्ती, मरिआई चौक, देगाव रोड, सोलापूर) यांच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारदार यांची वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथे सात हेक्टर ५२ गुंठे वडिलोपार्जित शेतजमीन आहे. तक्रारदार व त्यांच्या भावांच्या क्षेत्राची रीतसर मोजणी झाल्यानंतर पोटहिस्सा पाडून नकाशे मिळाले होते.

Anti Corruption
Anti-corruption Department : दोन लाखांची लाच मागणाऱ्या मंडलाधिकारी, तलाठ्यावर गुन्हा

त्यानंतर तक्रारदाराच्या पोटहिश्यातील विहीर व बोरवेलची नोंद लावण्यासाठी आकारफोड बाबत दक्षिण सोलापूरच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयास अर्ज केला होता. ते काम करून साहेबांची स्वाक्षरी घेऊन तहसिल कार्यालयास पाठविण्यासाठी संशयित आरोपीने दहा हजार रुपयांची लाच मागितली.

Anti Corruption
Kolhapur Anti Corruption Department : जळालेल्या लाकडांची लाच घेणं पडलं महागात, वनविभागाच्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई

त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठले. तक्रारीच्या अनुषंगाने सोमवारी (ता. २८) पडताळणी दरम्यान शंकर बजबळकर याने तडजोडअंती नऊ हजाराची लाच घेण्याचे मान्य करून रक्कम रिक्षा चालक सर्वगोड यास द्यायला सांगितले. तो खासगी इसम होटगी रोडवरील किनारा हॉटेल परिसरात लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडला.

संशयित आरोपीच्या घर झडतीसाठी पथक रवाना करण्यात आले असून त्यावेळी घरात काही सापडले नाही, ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत चौगुले व पोलिस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस फौजदार एस. व्ही. कोळी, अंमलदार संतोष नरोटे, गजानन किणगी, राजू पवार, सचिन राठोड व चालक राहुल गायकवाड, अक्षय श्रीराम यांच्या पथकाने केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com