Crop Inspection : पीक पाहणीसाठी कृषी अधिकाऱ्यांसह शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर

Rabi Season : ब्बी हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता. १५) सोयगाव तालुक्यात कृषी अधिकारी व शास्त्रज्ञांच्या समन्वयातून पीक पाणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
Crop Inspection
Crop InspectionAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : रब्बी हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता. १५) सोयगाव तालुक्यात कृषी अधिकारी व शास्त्रज्ञांच्या समन्वयातून पीक पाणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या दौऱ्यात हिमायतबाग फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील, राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. सूर्यकांत पवार, उपविभागीय कृषि अधिकारी सुभाष आघाव, वनस्पती विकृतितज्ज्ञ डॉ. दिलीप हिंगोले, तालुका कृषी अधिकारी रमेश गुंडिले, एनएआरपीचे रामेश्वर ठोंबरे यांच्यासह कृषी पर्यवेक्षक समाधान चौधरी, कृषी सहायक कैलास कुमावत, बेबीचंद चौरे, विजय निकुंभ, मयूर बारी, विश्वजीत तायडे, अर्जुन सुरळकर, राधिका सोळुंके, दत्ता मुठाळ, एल. टी. साळवे, वैष्णवी भगत, वैष्णवी नन्नावरे, अक्षय सावसके, हितेश झाडे, योगेश पवार आदीं उपस्थित होते.

Crop Inspection
Rabi Season : लातूर विभागात रब्बीचे क्षेत्र यंदा वाढण्याची आशा

या प्रक्षेत्र भेटीत किन्ही येथील दिलीप रघुनाथ देशमुख यांच्या केळी पिकाची, किशोर तेजराव फलके यांच्या शेतावर मका पिकाची, नाना सूर्यवंशी यांच्या शेतावर मोसंबी न्यूसेलर पिकाची, मुखेड येथे साहेबराव नामदेव पाटील यांच्या मका पिकाची, पळाशी येथील रघुनाथ नामदेव सपकाळ /दत्तू नामदेव सपकाळ यांच्या शेतावर केळी पीक, घोरकुंड येथे श्रावण तेजराव गायकवाड यांचे शेडनेट, काकडी, पपई, टरबूज, भुईमूग पीक, तिडका गावात दत्तू त्रंबक बांबर्दे यांच्या शेतात मका ईश्वर शिवाजी सपकाळ यांची हळद व कांदा पीक,

घोसला येथे स्वप्नील नारायण बोरसे यांच्या केळी पिकाची, बहुलखेडा येथे अमोल धनगर यांच्या शेतावर मोसंबी, पपई व केळीची, जरंडी येथील राजेंद्र चिंतामण महाजन यांचे शेतावर हरभरा पिकातील मर रोग, कृषिभूषण शेतकरी रवींद्र रामदास पाटील यांच्या शेतात गोदावरी तूर पिकाची, कंकराळा येथील शिवदास लालचंद राजपूत यांच्या शेतावर गहू, पेरू, केळी, मोसंबी पिकांची, ज्ञानेश्वर उत्तम सोन्ने यांच्या शेतात भेटी देऊन शास्त्रज्ञ डॉ. पाटील डॉ. पवार, उपविभागीय कृषी अधिकारी श्री आघाव, तालुका कृषी अधिकारी श्री. गुंडीले, डॉ. हिंगोले, आदींनी फळ पिकासह रब्बी पिकातील उद्भवणाऱ्या समस्यांवर मार्गदर्शन केले.

Crop Inspection
Tembhu Water Rabi Season : रब्बी हंगामासाठी ‘टेंभू’चे आवर्तन सुरू, ३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा

तंत्रज्ञानातील तफावतीमुळे फळपिकावर दुष्परिणाम

सोयगाव तालुक्यात फळ-भाजीपाला पिकामध्ये शिफारशीत अंतराचा अभाव, खते मातीआड न करणे, बागेत स्वच्छतेचा अभाव, बुरशिनाशकाची आळवणी न करणे, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर नसणे, बेडनिर्मितीतील चुका आदी कारणांमुळे फळबागांच्या आणि भाजीपाल्याच्या उत्पादकतेवर विपरित परिणाम दिसून येत असल्याचे प्रतिपादन हिमायतबाग फळ संशोधन केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले.

डॉ. पाटील म्हणाले, की केळी, मोसंबी फळपिकाची शिफारशीत लागवड नसल्यामुळे विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागत आहे. बागेत सूर्यप्रकाश अन् हवा खेळती नसल्यामुळे अन्नाद्रव्यनिर्मिती कमी होऊन दमट वातावरण निर्माण होत आहे, तर नियंत्रित शेतीपद्धतीत तयार केलेले वाफे भुसभुशीत नसल्याने, त्यात रेती, लालमाती न मिसळल्याने ते कडक बनले आहे, त्यामुळे भाजीपाला -फळपिकाच्या वाढीवर अन उत्पादनावर विपरित परिणाम दिसून येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com