
Solapur News: जिल्ह्यात सध्या दररोजच किंवा एक दिवसाआड तरी बिबट्याने कुठे जनावरांवर हल्ला केल्याच्या किंवा बिबट्या दिसल्याच्या बातम्या येतात. त्यामुळे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढल्याचे स्पष्ट आहे. जिल्ह्यात सुमारे ५० बिबट्या असल्याचे काहींचे म्हणणे आहे तर १०० हून अधिक बिबट्यांचा जिल्ह्यात वावर असल्याचेही काही अभ्यासक सांगतात.
त्यामुळे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या नेमकी किती हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वी सोलापूरकरांना वाघ, बिबट्या केवळ प्राणिसंग्रहालयात पाहायला मिळायचा.नरभक्षक बिबट्याने २०२० मध्ये जिल्ह्यात धुमाकुळ घातला होता. नरभक्षक बिबट्याने ३ डिसेंबर २०२० रोजी करमाळा तालुक्यातील रायगांव येथे ज्वारीला पाणी देण्यासाठी गेलेले कल्याण फुंदे यांना ठार केले होते तर ५ डिसेंबर रोजी
अंजनडोह येथील जयश्री शिंदे या लिंबोणीच्या बागेत लिंब गोळा करण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावर हल्ला करून त्यांनासुद्धा ठार केले होते. त्यानंतर याच तालुक्यातील चिखलठाण येथे ऊसतोडणी मजुराच्या आठ वर्षीय फुलाबाई हरिचंद हिच्यावर हल्ला करत तिला ठार केले होते. अखेर या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यास वन विभागाने परवानी दिली.
बिटरगावजवळील वांगी नंबर ४, येथील केळीच्या बागेत आलेल्या बिबट्याला शार्प शूटर असलेले अकलूजचे धवलसिंह मोहिते-पाटील यांनी बिबट्याला १५ फुटावरून आपल्या १२ बोअरच्या रायफलमधून सलग ३ गोळ्या घातल्या आणि बिबट्याचा खात्मा केला होता.
ठळक बाबी
जिल्ह्यात ऑगस्ट २०१६ मध्ये पहिल्यांदा ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद
करमाळा तालुक्यात ३ तर मोहोळ तालुक्यात १ बळी
रानडुक्कर, हरणांच्या संख्येवर नियंत्रणासाठी बिबट्या उपयोगी
बिबट्याने मानवावर हल्ले केल्याच्या घटना तुरळक
बिबट्याबरोबर सहजीवन कसे जगावे याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती आवश्यक
लवचिक जीवनशैली
बिबट्या हा अत्यंत लवचिक जीवनशैली स्वीकारतो. स्वत:चा निवारा आहार विहार यामध्ये उपलब्धतेनुसार बदल करतो. अलिकडील काळात उसाबरोबरच वैरणीसाठी वापरला जाणारा घास, केळी अशा पिकांमध्येही तो लपून राहत आहे. शेळी मेंढी, रेडकं-वासरे यांच्या शिकारी तो करतो. कुत्रा हे त्याचे सर्वात आवडते खाद्य आहे. सरपटणारे प्राणी, ससे, रानडुकरांची पिल्लेही तो फस्त करतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.