Leopard Terror Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Terror : उत्तर पुणे जिल्हा बिबट आपत्तिप्रवण क्षेत्र घोषित

Leopard Attack : जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर या चार तालुक्यांचा जुन्नर वन विभागामध्ये समावेश आहे.

Team Agrowon

Pune News : जुन्नर वनविभागातील मागील ५ वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यात मनुष्य जखमी व मृत्यूच्या घडलेल्या घटना लक्षात घेता जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यांतील २३३ अतिसंवेदनशील गावांना ‘संभाव्य बिबट आपत्तिप्रवण क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे.

जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर या चार तालुक्यांचा जुन्नर वन विभागामध्ये समावेश आहे. या वन विभागाचे क्षेत्र व्यवस्थापनाच्या दृष्टीने अनुक्रमे जुन्नर, ओतूर, मंचर, बोडेगाव, खेड, चाकण व शिरूर या सात वनपरिक्षेत्रामध्ये विभागलेले आहे. जुन्नर वन विभागाचे बहुतांश क्षेत्र डोंगराळ असून, यामध्ये पाटबंधारे विभागाचे सिंचन प्रकल्प आहेत. यात प्रामुख्याने घोड व कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे, माणिकडोह, पिपळगाव जोगे, बडन, चिल्हेवाडी, चासकमान असे मध्यम व लघुपाटबंधारे प्रकल्प असल्याने सिंचन सुविधेत वाढ झालेली आहे.

बिबट्याची संख्या वाढायला ऊस कारणीभूत

सिंचन सुविधांमुळे ऊस, केळी, द्राक्ष, डाळिंब अशी दीर्घकालीन बागायती पिके या भागात मोठ्या प्रमाणात होतात. या दीर्घकालीन पिकांमध्ये बिबट्यांना लपण्यासाठी उत्तम निवारा आणि पाण्याची मुबलक उपलब्धता असते. तसेच शेती व्यवसायामुळे मानवाची पाळीव प्राण्यांसह शेतातील रहिवासांमध्ये वाढ झाली आहे.

यामुळे पाळीव प्राणी भक्ष्य म्हणून सहज उपलब्ध होत असल्याने बिबट या वन्यप्राण्यांचा अधिवास अशा बागायती क्षेत्रातच निर्माण झालेला आहे. बिबट्यांचे वास्तव्य हे प्रामुख्याने ऊस शेतीत आहे. या प्रकरणी गेल्या २३ वर्षांपासून या वनविभागात मानव बिबट संघर्षामध्ये वाढ होत आहे.

या क्षेत्रात बिबट्याचा मानवावरील हल्ला होण्याच्या घटनेत वाढ झाली असून सदरचे क्षेत्र हे मानव-बिबट संघर्षाचे आपत्तिक्षेत्र झालेले आहे. बिबट वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी व मृत्यूच्या घटनेची व्याप्ती लक्षात घेता सदर क्षेत्र ‘संभाव्य बिबट आपत्तिप्रवण क्षेत्र’ घोषित करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

४५० बिबट्यांचा वावर

डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेच्या वतीने जुन्नर वनविभागाच्या हद्दीत अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यास आणि अहवालानुसार बिबट्याच्या संख्येची घनता प्रति १०० चौ.कि.मी.मध्ये ६ ते ७ बिबटे इतकी आढळून आली आहे. तसेच बिबट्यांचे मानवावरील, पशुधनावरील हल्ले पाहता जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर या तालुक्यांमध्ये बिबट्यांची एकूण संख्या अंदाजे ४०० ते ४५० असण्याची शक्यता अहवालात वर्तविण्यात आली आहे.

गेल्या पाच वर्षांत १६ जणांचा मृत्यू

जुन्नर वनविभागात मागील ५ वर्षात बिबट वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एकूण ४० गंभीर जखमी व १६ मृत्यूच्या घटना घडलेल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget: शेती आणि पूरक उद्योगासाठी ‘अर्थपूर्ण’ पाऊल

Water Sector Budget: जलक्षेत्रासाठी दीर्घकालीन तरतुदींवर भर

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

SCROLL FOR NEXT