Leopard Awareness : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात बिबट्या बद्दल जनजागृती कार्यक्रम

Leopard Terror : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागात वनविभागाच्यावतीने बिबट्याबद्दल जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Leopard Attack
Leopard AttackAgrowon
Published on
Updated on

Pune News : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागात वनविभागाच्यावतीने बिबट्याबद्दल जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये चाकण वनपरिक्षेत्रांतर्गत वनपरिमंडल आंबोली अंतर्गत बिबट प्रवण क्षेत्र वांद्रे, तांबडेवाडी, विऱ्हाम, आढे, आंबोली व आसपासच्या वाड्यावस्त्यांचा समावेश आहे.

खेड तालुक्यातील अनेक भागात बिबट वन्य प्राण्याचा अधिवास आढळून येत आहे. मानव-बिबट संघर्ष होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. बिबट्याचा मानवी वस्तीतील मुक्त वावर, शेतात काम करताना बिबट्याचे होत असलेले दर्शन, पशुधनावरील हल्ले होण्याच्या घटनेमध्ये होत असलेली वाढीमुळे शेतकरी व नागरिकांमधे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leopard Attack
Leopard Conservation : बिबट्यासाठी ‘येडगाव’ची दहा एकर जागा निश्‍चित

वनपरिमंडल आंबोलीअंतर्गत बिबट प्रवण क्षेत्र वांद्रे, तांबडेवाडी, विऱ्हाम, आढे, आंबोली तसेच आसपासच्या वाड्यावस्त्यांवरील जिल्हा परिषद शाळामध्ये बिबट या वन्यप्राण्याबद्दलची पुस्तके, माहितीपत्रकांद्वारा जनजागृती करण्यात आली.

Leopard Attack
Leopard Terror : उत्तर पुणे जिल्हा बिबट्या आपत्तिग्रस्त जाहीर करा

उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांचे मार्गदर्शनाखाली आंबोलीचे वनपाल संतोष आगरकर, वनरक्षक ओम पवार, वनरक्षक श्रीमती जगताप यांनी या पश्चिम पट्यातील विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांना बिबट्याबद्दल माहिती दिली.

सतर्क राहण्याचे आवाहन

चाकण वनविभागाचे वतीने खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी क्षेत्रातील भागात बिबट वन्यप्राण्याच्या जनजागृतीच्या माध्यमातून गावोगावी व वाड्यावस्त्यांवर जाऊन शेतकरी व ग्रामस्थांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क राहण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असल्याची माहिती चाकणचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com