Leopard Terror : उत्तर पुणे जिल्हा बिबट्या आपत्तिग्रस्त जाहीर करा

Leopard Attack : जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ मध्ये जुन्नर वन विभागांतर्गत बिबट प्रवण क्षेत्रात उपाययोजना करण्यासाठी विकासकामांना जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण व आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत निधी देण्याची तरतूद करण्यात येणार आहे.
Leopard Attack
Leopard AttackAgrowon
Published on
Updated on

Pune News : उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर हे चार तालुके बिबटे आपत्तिग्रस्त तालुके जाहीर करा, आणि ही समस्या निवारणासाठी विविध प्रकारच्या कामांना आपत्ती निवारण निधीची तरतूद करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना दिल्या आहेत, अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ मध्ये जुन्नर वन विभागांतर्गत बिबट प्रवण क्षेत्रात उपाययोजना करण्यासाठी विकासकामांना जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण व आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत निधी देण्याची तरतूद करण्यात येणार आहे.

Leopard Attack
Leopard Terror : आठ दिवसांत सहा बिबटे जेरबंद

आमदार बेनके यांनी बुधवारी (ता. १९) मंत्रालयात उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेऊन जुन्नर तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रातील गावांमध्ये विविध उपाययोजना करण्यासाठी निधीची व बिबट आपत्तिग्रस्त क्षेत्र जाहीर करण्याची मागणी केली.

या मागणीला उपमुख्यमंत्री पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रातील गावातील उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध देणे व बिबट आपत्तिग्रस्त क्षेत्र जाहीर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Leopard Attack
Leopard Terror : चाकूर तालुक्यात पुन्हा बिबट्याची दहशत

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून आपदा मित्र प्रशिक्षण देण्यासाठी निधी देणे, जनजागृती करण्यासाठी साहित्य खरेदी करणे, मेंढपाळांसाठी टेंट, सोलर लाइट खरेदी करणे, अति संवेदनशील भागासाठी अनायडर खरेदी करणे, बिबट प्रवण क्षेत्रातील गावातील शेतकऱ्यांसाठी नेक बेल्ट खरेदी करणे, आर्टिफिशियल इंटेलिजेंटवर आधारित कॅमेरे बसवणे,

वनसंरक्षण कामांकरिता जुन्नर परीक्षेत्रकरिता ७ वाहने, ट्रॅप कॅमेरा, सापळा पिंजरा, भिंत पिंजरा, नॉयलॉन दोर, ड्रोन खरेदी करणे, रेस्क्यू सदस्यांना मानधन देणे, अतिसंवेदनशील क्षेत्रात बिबट जनजागृती करण्यासाठी इंधन खर्च देणे, पिंजरे वाहतुकीसाठी निधी देणे, बिबट प्रवण क्षेत्रामध्ये गस्त घालण्यासाठी खासगी वाहनांची व्यवस्था करणे आदी बाबींना निधी उपलब्ध करून देण्याचे व आपत्तिग्रस्त क्षेत्र जाहीर करण्याचे निर्देश अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे बिबट समस्या निराकरण करण्यास गती येणार आहे, अशी माहिती आमदार बेनके यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com