Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : पाणीटंचाईच्या उपाययोजना राबविण्यात हलगर्जीपणा नको

Water Shortage : जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती आहे. जानेवारी २०२४ पासून टँकर सुरू करण्याच्या मागणीत वाढ होऊ शकते. त्यासाठी टंचाईच्या उपाययोजना राबविण्यात कोणीही हलगर्जीपणा करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती आहे. जानेवारी २०२४ पासून टँकर सुरू करण्याच्या मागणीत वाढ होऊ शकते. त्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यांतील तहसीलदार, गट विकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता व भूजल यंत्रणेचे अधिकारी यांनी लक्ष द्यावे.

जानेवारी ते जून २०२४ पर्यंत टँकर लागणाऱ्या गावांची संयुक्त पाहणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन करावी व तसा अहवाल पुढील पंधरा दिवसांत सादर करावा. टंचाईच्या उपाययोजना राबविण्यात कोणीही हलगर्जीपणा करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गुरुवारी (ता. ३०) दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे, उपजिल्हाधिकारी महसूल विठ्ठल उदमले, उपजिल्हाधिकारी रोहयो चारुशीला देशमुख, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता पी. व्ही. पाटील, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. दामा उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, की जिल्ह्यात कोणत्या गावात पाण्याच्या टँकरची आवश्यकता आहे. याची संबंधित तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता तसेच भूजल विभागाचे अधिकारी यांनी दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन पाहणी करावी.

गावाची व टँकरसाठी आवश्यक असलेल्या पाणी स्रोतांची पाहणी करताना संबंधित गावातील ग्रामसेवक व तलाठी यांनाही सोबत घ्यावे. त्यानंतर अभ्यासपूर्ण अहवाल सादर करावा. सर्व उपविभागीय अधिकारी यांनी प्रत्येक तालुक्यात सर्व संबंधित शासकीय यंत्रणाची दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या उपाय योजनाबाबत स्वतंत्र बैठका घेऊन संबंधितांना मार्गदर्शन करावे.

प्रत्येक शासकीय यंत्रणांनी दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे. चाऱ्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी पशुसंवर्धन विभागाने पुढील दोन महिने पुरेल एवढा चारा जिल्ह्यात उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे.

तरी पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांचा शोध घ्यावा व त्यांना चारा निर्माण करण्यासाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे. बियाण्यासाठी नियोजन समितीमधून दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT