Water Crisis : नागपूर जिल्ह्यातील पाणीपातळी खालावली

Water Shortage : नागपूर जिल्ह्यात गतवर्षी नोव्हेंबर महिन्यांच्या आकडेवारीशी तुलना केल्यास बहुतेक प्रकल्पांमधील सध्याची पाणीपातळी चिंतेचे संकेत देणारी ठरली आहे.
पाणीपातळी खालावली
पाणीपातळी खालावलीAgrowon

Nagpur News : मॉन्सून काळात विदर्भातील जवळपास सर्वच धरणे तुडुंब भरली. सिंचनासह वेगवेगळ्या कारणांसाठी पाण्याचा विसर्ग केला गेला. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यांच्या आकडेवारीशी तुलना केल्यास बहुतेक प्रकल्पांमधील सध्याची पाणीपातळी चिंतेचे संकेत देणारी ठरली आहे. उन्हाळ्यात संकटांचा समाना करावा लागण्याचे संकेत त्यातून मिळत आहेत.

सप्टेंबर महिन्यात नागपूर शहराची तहान भागविणारे नवेगाव खैरी व तोतलाडोह प्रकल्प १०० टक्के भरले होते. शहरालगतच्या वसाहतींची गरज भागविणारे वडगाव धरणही ९८ टक्के भरले होते. सद्यःस्थितीत मात्र नवेगाव खैरी प्रकल्पातील पाणीसाठा ११२ दलघमीवर आला असून हे प्रमाण ५१ टक्के आहे.

पाणीपातळी खालावली
Jaykwadi Dam Water Issue : ‘जायकवाडी’चा मृतसाठा वापरावा

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात ९२.८९ टक्के जलसाठा होता. तोतलाहोह धरणात ८०.३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच दिवशी हा साठा ९४.६५ टक्के होता. वडगाव धरणातील जलसाठा ८२.७७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गतवर्षी याच दिवशी साठा ९४.९५ टक्के होता.

पाणीपातळी खालावली
Water Issue : पाणीप्रश्‍नावर मराठवाडा बहुजन विकास आघाडीचा बैठा सत्याग्रह

मध्यम प्रकल्पांची स्थिती

विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये आजघडीला एकूण ३३८९ दलघमी जलसाठा असून एकूण क्षमतेच्या तुलनेत हे प्रमाण ७३.६५ टक्के आहे. गतवर्षी याच सुमारास धरणांमध्ये ८६.२४ टक्के जलसाठा होता. जलसाठा कमी वाटत असला तरी पाण्याची गरज लक्षात घेतल्यास हा जलसाठा चांगला असल्याचे मानले जात आहे.

मध्यम प्रकल्पांची जलधारण क्षमता ७०८ दलघमी असून ५५५ दलघमी जलसाठा उपलब्ध साहे. सप्टेंबर महिन्यात ९४.२९ टक्क्यांपर्यंत पोहोचलेला जलसाठा आता ७६ टक्क्यांवर आला आहे. गतवर्षी याच कालावधीत ८८.३० टक्के जलसाठा होता. लघू प्रकल्पांमधील जलसाठ्याचे प्रमाण काहीसे कमी दिसत आहे. या प्रकल्पांमधील जलसाठा सप्टेंबरमध्ये ४५२.७१ दलघमीपर्यंत अर्थात ७६ टक्क्यांवर पोहोचला होता. तो आता ३८४ दलघमीवर म्हणजे ६४ टक्क्यांवर आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com