Rain Deficit Destroys Soybean Crop During Pod-Filling Stage in Ner  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Crop Damage: शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपले

Rainfall Deficit: नेर तालुक्यात यंदा मोठ्या क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. मात्र, ऐन शेंगा भरण्याच्या आणि दाणे पक्व होण्याच्या काळात महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीनची पिके अक्षरशः करपून गेली आहेत.

Team Agrowon

Farmers Demand Relief: नेर तालुक्यात यंदा मोठ्या क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. मात्र, ऐन शेंगा भरण्याच्या आणि दाणे पक्व होण्याच्या काळात महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीनची पिके अक्षरशः करपून गेली आहेत. गेल्या चार दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढल्याने अनेक शेतांतील सोयाबीन वाळून कोळसा झाले आहे. काही ठिकाणी या पिकाची सोंगणी करण्याचीही गरज भासणार नाही, अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नेर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

सोयाबीन पिकासाठी शेतकऱ्यांनी केलेला मशागत, बियाणे, खत, औषध आणि मजुरीचा खर्च पावसाअभावी मातीमोल झाला आहे. हिरवीगार दिसणारी सोयाबीनची पिके डोळ्यादेखत वाळून गेल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. कपाशीसह इतर खरीप पिकांनाही पावसाच्या दीर्घ खंडाचा फटका बसला आहे.

सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांचीही अडचण कमी झालेली नाही. विहिरीत पाणी उपलब्ध असतानाही वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाची वीज मिळणे आणि शेतीपंपांमध्ये बिघाड होणे, यामुळे पिकांना संरक्षित पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे पाणी उपलब्ध असूनही पिके वाचविता येत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

शेतशिवारात सर्वत्र वाळलेली सोयाबीनची पिके पाहून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वर्षभराच्या उत्पन्नाची आशा असलेले पीक हातातून गेल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेताकडे जाणेही टाळल्याचे चित्र आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि पुढील हंगामाचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाआहे.

पिके हातात येणार नसल्याने त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवरही जाणवत आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा येण्याची शक्यता कमी झाल्याने बाजारपेठेतील ग्राहकांची वर्दळ घटली आहे. त्यामुळे व्यापारी, किरकोळ व्यावसायिक आणि शेतमजूर वर्गालाही या संकटाची झळ बसत आहे.

यंदा तरी पीकविमा मिळावा

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होऊनही अनेक शेतकरी पीकविम्याच्या भरपाईपासून वंचित राहिले. यंदा ऐन हंगामात पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीनसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून पीकविमा भरपाई द्यावी. तसेच नेर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Survey: परभणी जिल्ह्यात पीक नुकसान पंचनामे वेगाने

Ground Water Level: भूजल पातळीत सरासरी १.११ मीटरची घट

Sangli District Bank: सांगली जिल्हा बँकेसाठी ३५१ अर्ज

Watermelon Cultivation: खानदेशात कलिंगड लागवड घटली

Mahabeej Seed Distribution Plan: शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणार महाबीजचे बियाणे; महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामींची माहिती

SCROLL FOR NEXT