Rain Break: मागील जवळपास ४० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पश्चिम विदर्भातील खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला आहे. सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने दिलेल्या दीर्घ खंडाचा सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसला असून, अनेक भागांत पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. .यांसह आता कपाशी, तूर, मका व इतर खरीप पिकांची अवस्थाही दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांतील विविध तालुक्यांतून शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दररोज प्रशासनाकडे निवेदने व मागणीचे अर्ज दाखल होत आहेत..Rain Deficit: पावसाच्या खंडाने खरीप हंगाम संकटात.पावसाच्या दीर्घ खंडामुळे जमिनीतील ओलावा संपुष्टात येत असून, सोयाबीनची वाढ खुंटली आहे. अनेक ठिकाणी पिके वाळू लागली असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कपाशी पिकावरही या परिस्थितीचा परिणाम दिसून येत असून, पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास नुकसान अधिक वाढण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे..यंदा हंगामाच्या सुरुवातीला पावसाने चांगली साथ दिल्याने पिकांची वाढ समाधानकारक होती. मात्र, ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने परिस्थिती पूर्णपणे बदलली..अकोला जिल्ह्यात पिके वाळू लागलीअकोला जिल्ह्यात पावसाअभावी दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत मागील सुमारे ४० दिवसांपासून समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी सोयाबीन, तूर आणि इतर खरीप पिके वाळू लागल्याचे विदारक चित्र शेतशिवारात दिसत आहे. अकोला, पातूर, बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूरसह इतर तालुक्यांमध्येही पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. पिकांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्याने पश्चिम विदर्भात तातडीने परिस्थितीचे सर्वेक्षण करून दुष्काळ जाहीर करावा, पीक नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत व पीकविम्याचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे..Rainfall Deficit: पावसाअभावी खरिपातील पिकांनी टाकल्या माना.बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणीबुलडाणा जिल्ह्यातही पावसाने दीर्घ खंड दिल्यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, मका यासह विविध खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे. अनेक गावांमध्ये पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि आगामी रब्बी हंगामाची चिंता निर्माण झाली असून, शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची भेट घेऊन जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. .तातडीने पिकांचे पंचनामे व पीकविमा सर्वेक्षण करावे, खरीप कर्जाचे पुनर्गठन करावे तसेच रब्बी हंगामासाठी बियाणे व कर्जाची मदत उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या. पशुधनासाठी चारा व पाण्याची तातडीने व्यवस्था करावी तसेच भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी ‘बुलडाणा पॅटर्न’ आणि मनरेगाच्या माध्यमातून व्यापक जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत, अशा सूचनाही निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत. या वेळी महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख विशाल ठाकरे, तालुका संपर्कप्रमुख कैलास पिंगाणे, प्रमोद महाले, आकाश पाटील, संतोष शर्मा, दामोदर भोयर यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते..मानोरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणीवाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात मागील महिनाभरापासून पावसाने मोठी दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. हातातोंडाशी आलेले सोयाबीन, तूर, कपाशी व इतर पिके वाळू लागली आहेत. यंदा तालुक्यात संत्रा बागांची फूट चांगली झाली होती. मात्र, पावसाच्या मोठ्या खंडामुळे संत्राफळांची गळ होत असून, बागायतदारांचे नुकसान वाढत आहे. बागांवर झालेला मोठा खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. .पावसाच्या खंडामुळे सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून, तालुक्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ व तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि नुकसानभरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, तसेच पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांना विमा मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.