Farmers Facing Challenges: खानदेशात प्रतिकूल हवामानामुळे कलिंगडाची लागवड घटली आहे. लागवडीत यंदाही सातत्याने घट होत असून, ऑक्टोबरअखेर सुमारे ३०० हेक्टरवर कलिंगड पीक राहील, अशी स्थिती आहे..खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांत खरिपातील उशिराच्या कलिंगडाची लागवड केली जाते. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक लागवड जामनेर तालुक्यात होते. जामनेरात सुमारे ७० हेक्टरवर पावसाळी किंवा खरिपातील कलिंगडाची लागवड पूर्ण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, शहादा भागातही लागवड केली जात आहे. मात्र, या भागातील लागवड अद्याप ३० टक्केही झालेली नाही. यंदा प्रतिकूल वातावरण असल्याने शेतकरी लागवडीपासून दूर राहत आहेत..Watermelon Farming : कलिंगडास प्रतिकूल वातावरणाचा फटका.जळगाव जिल्ह्यात यंदा कलिंगडाची लागवड कमी राहण्याची शक्यता आहे. जुलै ते ऑगस्ट या कालावधीत कलिंगडाची लागवड झाली होती. या कालावधीत एकूण लागवड १५० हेक्टरपेक्षा अधिक झाली होती. मात्र, सध्या उष्णता व प्रतिकूल हवामानामुळे लागवड रखडत सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर, चोपडा भागात कलिंगडाची लागवड अधिक होते. अन्य भागांत तुलनेने कमी लागवड केली जाते..Watermelon Cultivation: खानदेशात कलिंगड लागवड सुरूच.आतापर्यंत खानदेशात मिळून सुमारे २०० हेक्टरवर कलिंगडाची लागवड झाल्याचा अंदाज आहे. या महिन्यातही काही शेतकरी लागवड करणार आहेत. ऑक्टोबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यातही लागवड होण्याची शक्यता आहे. मात्र, अनेक शेतकरी सध्या लागवड टाळत आहेत. बियाणे तसेच रोपांद्वारे कलिंगडाची लागवड केली जाते. मात्र, नुकसानीच्या भीतीने यंदा लागवड करण्याचे प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे..नोव्हेंबरमध्ये लागवड वाढण्याची शक्यताया महिन्यात वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आता उर्वरित लागवड पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. खरिपातील तसेच आगाप कलिंगडासाठी खानदेशातील जामनेर, चोपडा, धुळे जिल्ह्यातील शिरपूर, नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व शहादा हे भाग प्रसिद्ध आहेत. एकट्या जामनेर तालुक्यात १०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कलिंगडाची लागवड केली जाते. पुढील काळात, विशेषतः नोव्हेंबरमध्ये कलिंगड लागवड वाढण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.