Indian Railway Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur Railway : सांगोला-मंगळवेढा-सोलापूर रेल्वेची गरज; खासदारांची शिफारस

Central Railway Update : मध्य रेल्वेकडे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला-मंगळवेढा-सोलापूर या नविन रेल्वेच्या सर्वेक्षणाची शिफारस करण्यात आली आहे

Team Agrowon

Solapur News : मध्य रेल्वेकडे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला-मंगळवेढा-सोलापूर या नविन रेल्वेच्या सर्वेक्षणाची शिफारस करण्यात आली आहे. या मार्गामुळे जीआय मानांकन असलेल्या डाळिंबाचे अर्थकारण भक्कम होण्यास मदत होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात सांगोला-मंगळवेढा-सोलापूर या नविन रेल्वेचा प्रस्ताव खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी मांडला. सुरवातीला २०२२ मध्ये लोकसभा अधिवेशनात या नव्या रेल्वेची मागणी केली गेली. त्यानंतर मध्य रेल्वेच्या लोकप्रतिनिधी व सल्लागार समितीच्या बैठकीत काही दिवसांपूर्वी या मागणीवर पाठपुरावा करण्यात आला.

याच बैठकीत सोलापूर विभागीय रेल्वे समितीचे अध्यक्षपद खा. डॉ. महास्वामी यांच्याकडे आले. त्यामुळे आगामी काळातील विभागीय समित्यांचे अध्यक्षपद त्यांच्याकडे असेल. मध्य रेल्वेच्या सर्व प्रमुख प्रस्तावात या नव्या रेल्वेचा प्रस्ताव अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

अर्थकारण भक्कम करणारा प्रस्ताव

सांगोला तालुका सोलापूर जिल्हास्थानापासून मोठ्या अंतरावर असलेला भाग आहे. पण सांगोल्याचे अर्थकारण मोठ्या प्रमाणात बदलत आहे. एकेकाळी दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेला सांगोला आता डाळिंब निर्मितीचे आगार बनला आहे. मागील काही वर्षात किसान रेलचा प्रयोग केला गेला.

तेव्हा सांगोल्यातून सर्वाधिक डाळिंबाची वाहतूक देशातील इतर बाजारपेठांमध्ये किसान रेलद्वारे झाली. यावरून सांगोल्याला रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळाली तर तेथील अर्थकारण मजबूत होऊ शकते हे सिद्ध झाले. यातून आगामी काळात सांगोल्याची शेती त्यामुळे अधिक समृध्द होऊ शकते.

मंगळवेढ्याची साथ मोलाची

रेल्वेच्या प्रस्तावित मार्गावरील मंगळवेढा हे महत्त्वाचे शहर या मार्गाशी जोडलेले आहे. मंगळवेढ्याला सध्या रेल्वे स्थानक नाही. त्यामुळे या प्रस्तावाने हे सांस्कृतिक शहर रेल्वेसोबत जोडले जाईल. तसेच जिल्हा केंद्र असलेल्या सोलापूरला येण्यासाठी हा मार्ग अधिक उपयुक्त ठरणार आहे.

मिरजकडून येणाऱ्या प्रवाशांना सध्या लांब अंतराने प्रवास करावा लागतो ते अंतर कमी होण्यास मदत होणार आहे. मागील वर्षी आमदार समाधान आवताडे यांनी या मार्गाची मागणी केंद्राकडे केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Agriculture Commissioner Suraj Mandhare : धोरणात्मक बदलामुळे गुणनियंत्रण होणार प्रभावी

Wildlife Conflict: वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांची मान फासात

Environmental Management: इरिओफाइड कोळीचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन

Agarbatti Business: अगरबत्ती उद्योगात तयार केला ब्रॅण्ड

Mission Jalbandhu: रोजगार, जलसुरक्षितेसाठी ‘मिशन जलबंधू’

SCROLL FOR NEXT