Sugarcane Rate : कुमठ्यात ऊस वाहतूक रोखल्‍याने वाहतूक कोंडी

Sugarcane Farmer Protest : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दरप्रश्नी सातारा-लातूर महामार्गावर येथील कुमठे फाट्यावर ऊस वाहतूक तथा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले
Sugarcane Rate
Sugarcane RateAgrowon

Satara News : मागील हंगामात तोडून नेलेल्या उसाचे प्रतिटन ४०० रुपये द्यावेत, या हंगामात उसाची पहिली उचल साडेतीन हजार रुपये जाहीर करावी, या मागणीसाठी कोरेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सातारा-लातूर महामार्गावर येथील कुमठे फाट्यावर सुमारे अर्धा तास ऊस वाहतूक रोखली. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन रस्ता वाहतूक सुरळीत केली.

Sugarcane Rate
Sugarcane Season : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस वाहतूक करणारी वाहने रोखली

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दरप्रश्र्नी ऊस वाहतूक तथा रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन कोरेगावचे तहसीलदार, पोलिसांना दिले होते. त्यानुसार मंगळवारी (ता.२१) सकाळी पावणे अकराच्या सुमारास कोरेगाव तालुकाध्यक्ष जीवन शिर्के यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले.

उसाला पहिली उचल साडेतीन हजार रुपये मिळालीच पाहिजे यांसह राजू शेट्टी आणि संघटनेच्या विजयाच्या घोषणा देत रस्त्यावर बसले. परिणामी कोरेगाव आणि पुसेगाव बाजूकडून येणारी सर्व वाहतूक पूर्णतः ठप्प झाली.

उसाच्या वाहनांसह एसटी, मालवाहतूक, दुचाकी वाहनांची रांग लागली. अखेर कोरेगावचे सहायक पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार, पोलिस उपनिरीक्षक दीपिका मुसळे यांनी श्री. शिर्के, हणमंतराव जगदाळे, विश्वासराव चव्हाण, उमेश जगदाळे आदींशी चर्चा करून रास्ता रोको आंदोलन मागे घेण्याची विनंती केली; परंतु आंदोलक जरंडेश्वर शुगर मिलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे येऊन दर जाहीर करण्यावर ठाम होते. तोवर कोंडीमध्ये अधिकच वाढ झाली. शेवटी पोलिसांनी आंदोलकांना पोलिस गाडीत बसवून पोलिस ठाण्यात पाठवून देऊन रस्ता रिकामा करून वाहतूक सुरळीत केली.

Sugarcane Rate
Sugarcane FRP : सहकारमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ, दुसऱ्या हप्त्यासाठी राजू शेट्टींचा कारखान्यांसह प्रशासनाला इशारा

पोलिस ठाण्यामध्ये आणलेल्या ११ आंदोलकांवर ६८ नुसार कारवाई करून नंतर सोडून देण्यात आले. त्यामध्ये अध्यक्ष जीवन शिर्के, विजय चं. झांजुर्णे, देवराज अ. झांजुर्णे, हणमंतराव जगदाळे, उमेश ज. जगदाळे, शरद ज. झांजुर्णे, रवींद्र वाघ, दत्तात्रय साळुंखे, पांडुरंग घोरपडे, प्रशांत साळुंखे, नागेश कोळी यांचा समावेश होता.

‘जरंडेश्वर’चा ऊस आज रोखणार

आंदोलकांना पोलिसात आणल्यानंतर ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष राजू शेळके तेथे दाखल झाले. यावेळी श्री. शेळके, जीवन शिर्के आणि हणमंतराव जगदाळे यांनी ‘जरंडेश्वर’ने आज, उद्या मागील हंगामातील ४०० रुपये, चालू हंगामातील पहिली उचल साडेतीन हजार रुपये जाहीर करावी अन्यथा आज, गुरुवारी (ता. २३) सकाळी ११ वाजता मनुश्री फाट्यावर (चिमणगाव गोटा) ‘जरंडेश्वर’ची ऊस वाहतूक दराची मागणी मान्य होईपर्यंत रोखण्याचा इशारा दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com