Pune News : पुणे जिल्हा परिषदेने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा ३०१ कोटी ६५ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी (ता. १७) मंजूर करण्यात आला. गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात सुमारे ९ कोटी रुपयांनी वाढ झालेली असून ३० योजनांपैकी निम्म्या नव्या योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे..मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विशाल पवार, ग्रामपंचायत विभागाचे भूषण जोशी, डॉ. राजेश वासनिक, डॉ विष्णू गर्जे, अजित पिसाळ, जिंतेंद्र चासकर विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते..२०२५-२६ मध्ये २९२ कोटी रुपयांचा मूळ अर्थसंकल्प होता. मात्र वर्षअखेर तो सुधारणा होऊन ५५५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. मूळ अंदाजापेक्षा २६३ कोटी रुपये अधिक निधी उपलब्ध झाल्याने हा आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे. त्यानुसार एकूण ३०१ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी गृहीत धरण्यात आला आहे. यातील ११५ कोटी रुपये ग्रामपंचायतींना दिले जाणार आहेत..Ahilyanagar ZP Budget: अहिल्यानगर झेडपीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी चार कोटी.अर्थसंकल्पाच्या आकारवाढीमागे राज्य शासनाकडे मुद्रांक शुल्कापोटी शिल्लक असलेली रक्कम जिल्हा परिषदेला प्राप्त होणे हा महत्त्वाचा घटक ठरला. एकूण २४८ कोटी रुपये मिळाल्यामुळे अर्थसंकल्पाचा आकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात विविध नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विकासकामांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.....या आहेत महत्त्वाच्या नवीन योजनाकृत्रिम बुद्धिमत्ता आत्मसात करण्यासाठी कौशल्य सेतू योजनाप्रत्यक्ष प्रयोगातून विज्ञान शिक्षणासाठी दोन ठिकाणी सायन्स पार्करोजगाराभिमुख शिक्षणासाठी स्किल सेंटरदिव्यांग व्यक्तींसाठी उपजीविका साह्यसर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगसाधना.जिल्ह्यात दोन ठिकाणी सोलर प्रकल्पसहा ठिकाणी घनकचरा प्रकल्पइस्रो, नासाबरोबर युरोपियन स्पेस सेंटरमध्येही विद्यार्थी जाणारशैक्षणिक गुणवत्ता निपुणच्या धर्तीवर निपुण पुणेची निर्मितीमुलांमध्ये साहित्याची आवड निर्माण होण्यासाठी बालकुमार साहित्य संमेलनजिल्हा परिषदेमध्ये विविध उपक्रम अनुभव केंद्रशालेय किशोरवयीन मुलींसाठी प्रत्येक शाळेत पिंक रूम.विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण वाढीसाठी बाल संसदविद्यार्थ्यांना राज्यातील इतर शाळांना भेटी देण्यासाठी ज्ञानसेतू कार्यक्रमजिल्हा परिषद शाळांची सीबीएसई शाळांना जोडणारपरदेशातील शिक्षण व्यवस्था जाणून घेण्यासाठी ग्रामपंचायत शिक्षकांना ग्लोबल गुरुजी या योजनेअंतर्गत परदेशात पाठवणारजिल्हा परिषद अंतर्गत दोन ठिकाणी इ चार्जिंग केंद्रदुबई शॉपिंग फेस्टिवल मध्ये स्वयंसहाय्यता गटांच्या महिलांचा सहभागबचत गटातील उत्पादनासाठी फिरती शॉपी योजनातालुका पातळीवरती शासकीय कार्यालयांमध्ये सावित्री कॅफे.Maharashtra Budget 2026: कंत्राटदारांचा कब्जा असलेला अर्थसंकल्प.विभागनिहाय तरतूद (कोटी रुपयांत)प्रशासन : १.५२सामान्य प्रशासन : ०.५१पंचायत विभाग : २१.७१मुद्रांक शुल्क वाटप : ११५.००वाढीव उपकर पंचायत समिती : २.००वित्त विभाग : १७.०१शिक्षण विभाग : १६.१४इमारत व दळणवळण (दक्षिण) : २५.००.इमारत व दळणवळण (उत्तर) : १९.४५पाटबंधारे विभाग : ५.८२वैद्यकीय विभाग : ६.९२सार्वजनिक आरोग्य स्थापत्य : ६.२५कृषी विभाग : ६२.५०पशुसंवर्धन विभाग : ६.००समाजकल्याण : २५.१५५ टक्के दिव्यांग कल्याण : ९.२०महिला व बालकल्याण : १२.५०एकूण : ३०१.०० कोटी.शिक्षण आणि आरोग्य तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय तंत्रज्ञान कौशल्यविकास, अक्षय ऊर्जा, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल प्रशासनाला बळकटी देणारा आहे. ए आय तंत्रज्ञानाचा शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण आणि शिक्षणाचा समावेश करणारी पुणे जिल्हा परिषद राज्यात पहिली ठरली आहे.गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.