Railway Station Renovation : रेल्वे स्थानाकांच्या नूतनीकरणासाठी १४१ कोटी

Railway Station In India : ‘अमृत भारत स्टेशन’अंतर्गत सोलापूरसह पंढरपूर, कुर्डुवाडी आणि दुधनी रेल्वे स्थानकांच्या नूतनीकरणाचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला.
Indian Railway
Indian RailwayAgrowon
Published on
Updated on

Solapur News : ‘अमृत भारत स्टेशन’अंतर्गत सोलापूरसह पंढरपूर, कुर्डुवाडी आणि दुधनी रेल्वे स्थानकांच्या नूतनीकरणाचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे आभासी पद्धतीने या वेळी उपस्थित होते. ‘अमृत भारत स्टेशन’अंतर्गत जिल्ह्यातील या चारही रेल्वे स्थानकांसाठी सुमारे १४१ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.

Indian Railway
Odisha Railway Accident : ओडिशात समोरासमोर दोन रेल्वेची धडक; मृतांचा आकडा २०० पेक्षा अधिक तर ९०० जण जखमी

या रेल्वे स्थानकांच्या नूतनीकरणातून स्टेशनचा कायापालट होऊन पंचतारांकित व्यवस्था सामान्य प्रवाशाला मिळतील.

या कार्यक्रमास विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे, आमदार समाधान अवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, संत शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, मुख्याधिकारी अरविंद माळी, रेल्वेचे वरिष्ठ मंडळ यांत्रिकी अभियंता राहुल गर्ग, मुख्य वाणिज्य निरीक्षक एच. व्ही. चांगण, ए. डी. एन. जनार्दन प्रसाद, मुख्य पर्यवेक्षक रमेश काळे, स्टेशन प्रबंधक चनगौडर, रेल्वे पोलिस निरीक्षक जाधव आदी उपस्थित होते.

Indian Railway
Kisan Railway : शेतीमाल वाहतुकीसाठी किसान रेल्वे सुरू करणार : डॉ. विखे

पंढरपुरात झालेल्या कार्यक्रमात आमदार समाधान अवताडे म्हणाले, की पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने मागील नऊ वर्षात सात राष्ट्रीय महामार्गाशी जोडले गेले आहे. आता रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणानंतर ते देशपातळीवर जाईल.

रेल्वे आणि रस्ते विकास झाल्यामुळे पंढरपूरच्या विकासाला चालना मिळाली असून, याचा लाभ भाविकांसह शेतकऱ्यांनाही होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पंढरपूर हे देशपातळीवर एक तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

नॅरोगेज ते इलेक्ट्रिक ब्रॉडगेज असा रेल्वेचा विकास झाल्याने पंढरपूरच्या विकासात मोठी भर पडली असल्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी या वेळी सांगितले. रेल्वे स्थानकाचा विकास होत असताना येथे येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन त्यांची ये-जा सुखकर व्हावी, शहरातील वाहतुकीवर ताण येऊ नये यासाठी रेल्वेने आपल्या हद्दीतील स्टेशन ते भाई राऊळ पुतळा या दरम्यान सध्या अस्तित्वात असलेला रस्ता दुरुस्त करून प्रवासी आणि स्टेशनकडे येणाऱ्या वाहनांसाठी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन रमेश काळे यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com