War Impact on Gas Supply: युद्ध परिस्थितीमुळे गॅसटंचाईच्या झळा आता पुणे बाजार समितीमधील छोटी हॉटेल्स आणि उपाहारगृहांना बसू लागला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने हॉटेल्स बंद झाल्याने शेतकऱ्यांसह बाजार घटकांना भूक भागविण्यासाठी इतरत्र जावे लागत आहे. .आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे शहरात गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. बाजार समितीमधील श्री शारदा गजानन मंडळाकडून शेतकऱ्यांना विनामूल्य भोजन उपलब्ध करून दिले जाते. बाजार आवारातील अन्य घटकांकडून भोजनासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते..Gas Cylinder Shortage: गॅस सिलिंडर टंचाईमुळे भाजीपाल्याला उठाव नाही.मात्र आता गॅस तुटवड्यामुळे सध्या हा उपक्रम बंद करण्यात आला आहे. बाजार आवरात शेतमाल घेऊन येणारे शेतकरी येथील उपाहारगृहांत जेवण करतात. बाजार आवाराच्या परिसरात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या गाड्यादेखील आहेत. गॅस तुटवड्यामुळे बाजार आवारातील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या गाड्याही बंद ठेवण्यात आल्या आहेत..Gas Shortage Issue: गॅस तुटवड्याचे राजकीय परिणाम.‘‘गॅस तुटवड्यामुळे खाद्यपदार्थ तयार करणे अवघड झाले आहे. बाजार आवारातील शेतकरी, कामगारांसह बाजार आवारातील सर्वांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समितीने प्रशासनाशी संपर्क साधून गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिल्यास उपासमारीची वेळ येणार नाही,’’ असे मार्केट यार्डातील उपाहारगृह चालक राजेंद्र चोरघे यांनी सांगितले..कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराचा समावेश अत्यावश्यक सेवेत होतो. शेतकरी परगावाहून शेतीमाल घेऊन बाजार आवारात येतात. बाजार आवारातील उपाहारगृह चालकांना जिल्हा प्रशासनाने सिलिंडर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करणार आहोत.प्रकाश जगताप, सभापती, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.