Navjeevan Project Agrowon
ॲग्रो विशेष

Navjeevan Project : ‘नवजीवन’ने दाखविला परिवर्तनाचा प्रकाश

बाएफ’ संस्थेच्या माध्यमातून माजी मंत्री स्व. विनायकदादा पाटील यांनी ‘नवजीवन’ प्रकल्पाची आखणी केली होती. यातून जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त तीस शेतकरी कुटुंबांतील महिलांना पुन्हा सक्षमपणे उभे करण्यासाठी फळबाग लागवड, ठिबक सिंचन, विहीर खोदकाम आणि गरजेनुसार दुष्काळात टँकरने पाणीपुरवठा अशी मदत केली गेली.

Mukund Pingle

मुकुंद पिंगळे : ॲग्रोवन वृत्तसेवा

नाशिक ः नापिकी, शेतीकर्ज अन् नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बेजार झाला आहे. या गंभीर परिस्थितीला कंटाळून काही शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) करतात. परिणामी, त्यांच्या पश्‍चात कुटुंबाची वाताहत होते. शासन दरबारी आत्महत्यांची नोंद झाल्यानंतर विधवा पत्नींना मदत वाटप होते; मात्र तीही नावापुरतीच. यातून हे कुटुंब पुन्हा उभे राहत नसल्याचे वास्तव आहे.

यावर चिंतन करून ‘बाएफ’ संस्थेच्या माध्यमातून माजी मंत्री स्व. विनायकदादा पाटील यांनी ‘नवजीवन’ प्रकल्पाची आखणी केली होती. यातून जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त तीस शेतकरी कुटुंबांतील महिलांना पुन्हा सक्षमपणे उभे करण्यासाठी फळबाग लागवड, ठिबक सिंचन, विहीर खोदकाम आणि गरजेनुसार दुष्काळात टँकरने पाणीपुरवठा अशी मदत केली गेली. या धोरणात्मक मदतीने महिलांच्या अंधकारमय आयुष्यात परिवर्तनाचा प्रकाश पडला आहे.

२०१६ मध्ये नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना विनायकदादांच्या हस्ते किराणा साहित्य, साडीचोळी असे मदतीचे वाटप झाले. कार्यक्रम संपल्यानंतर विनायकदादा अस्वस्थ झाले. समाजाकडे करुणा आहे, मदत करण्याची इच्छा आहे, मात्र तिचे स्वरूप व्यवहार्य नाही. ज्या गोष्टीमुळे तिचा कुटुंब प्रमुख गेला, तर या मदतीने हे कुटुंब पुन्हा उभे राहणार का? यावर चिंतन करत विनायकदादा ‘बाएफ’ संस्थेचे विश्‍वस्त या नात्याने पुढे आले.

दीर्घकालीन उपाययोजनांसाठी ‘नवजीवन प्रकल्प’ हाती घेतला. त्यांनतर शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यादी मिळवून गरज आणि मागणी विचारात घेतली. स्वतः विनायकदादा पाटील, बाएफ संस्थेचे राज्य मुख्य कार्यक्रम समन्वयक सुधीर वागळे आणि वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी (कृषी) राहुल जाधव यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या सोबत भेट दौरे केले. यातून सुरुवातीला २०१६ आणि २०१७ साली ३० कुटुंबाची निवड केली.

प्रत्येकी १ लाख असे ३० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याने विनायकदादांनी दातृत्व असलेल्या व्यक्ती व संस्थाकडून २५ लाखांपर्यंत मदत जमा झाली. ‘बाएफ’ने संस्थेच्या स्वनिधीतून ५ लाख रुपये देऊ केले. भांडवल उपलब्ध झाल्यावर निवड झालेल्या कुटुंबाला मदत देण्यास सुरुवात झाली. त्यातूनच ३० महिला जिद्दीने गुणवत्तापूर्ण शेतीमाल पिकवून उत्पन्न मिळवत आहेत. आत्मसन्मान मिळवून देण्याचा हा नवजीवन प्रकल्प पथदर्शी ठरला आहे. मदत कशी करावी आणि घेणाऱ्याने सिद्ध कसे करून दाखवावे, हा आदर्श यातून नक्कीच घेण्यासारखा आहे.

...अशी झाली मदत
-शेवगा, डाळिंब, पेरू, लिंबू लागवडीस सहकार्य.
-सिंचन स्रोत उपलब्ध नसलेल्या कुटुंबांसाठी विहीर व कूपनलिका खोदणी.
- पीक लागवड ते काढणी सर्व पीक खर्चासह व्यवस्थापनसंबंधी मार्गदर्शन.
- काही महिलांना द्राक्ष बाग मंडप उभारणीसाठी मदत.
-लागवडपूर्व नियोजन ते काढणीदरम्यान पीक संरक्षण खर्च.
-सिंचन स्रोत उपलब्ध नसलेल्या ठिकाणी फळबागांना टँकरद्वारे पाणीपुरवठा खर्च वितरण.
-उत्पादन वाढ, काढणी पद्धती, काढणी पश्चात तंत्रज्ञान, हाताळणी व प्रतवारी, विपणन कौशल्याबाबत मार्गदर्शन.


केल्याने होत आहे रे...
महिला तंत्रज्ञानाभिमुख झाल्या आहेत. फलोत्पादनातून उत्पन्नवाढ साधल्याने कर्जाचा डोंगर कमी झाला आहे. काहींनी उत्पन्नाच्या बचतीतून शेती विकास, घराचे बांधकाम केले. आर्थिक व्यवहार साक्षरतेसह बाजारपेठेचे ज्ञान येऊन उत्पादन ते विक्रीमध्ये महिला कुशल झाल्या आहेत. मुलांचे उच्चशिक्षण, कुटुंब खर्च यासाठी आदर्श नियोजन करून त्या वाटचाल करत आहेत.

प्रतिक्रिया:
‘‘पूर्वी विहीर खोदलेली होती, मात्र पाणी नव्हते. बाएफ संस्थेने पुन्हा १५ फूट खोल विहिरीचे काम करून दिले. त्यामुळे पाण्याची व्यवस्था झाली आहे. या अगोदर भुईमूग, बाजरी, कपाशी अशी जिरायती पिके घ्यायचे. आता कांदा, भाजीपाला पिकांची लागवड आहे. संस्थेकडून अडचणीत मदत झाली, शिवाय दोन पैसे मिळू लागल्याने आता कुटुंब स्थिरस्थावर झाले आहे.
-मनीषा महेश सोनवणे, (पाडळदे, ता. मालेगाव)

‘‘कूपनलिका करून दिल्यानंतर मुबलक पाणी लागले. त्यामुळे खरिपानंतर रब्बी हंगामात कांदा लागवडीवर भर दिला आहे. सर्व शेती सिंचनाखाली आली, पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली. आता शेतात कष्ट करून नवीन घर बांधले. मुलीला पोलिस बनविण्यासाठी नाशिक येथे प्रशिक्षणास पाठवले आहे.
-संगीता ज्ञानदेव पवार (वळवाडी, ता. मालेगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

Daytime Electricity : शेतीला दिवसा वीज द्या, महावितरणला दिले निवेदन

Maharashtra Election Results 2024 : मुख्यमंत्री शिंदे, फडणीस, अजित पवार, मुंडे आघाडीवर, भुजबळ, दिलीप वळीसे-पाटील पिछाडीवर

Assembly Election Result : कोल्हापुरातून मुश्रीफ, महाडिक आघाडीवर तर सांगलीत जयंत पाटील, विश्वजीत कदम, गाडगीळ यांची आघाडी

SCROLL FOR NEXT