PM Suryaghar Electricity Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

PM Suryaghar Electricity Scheme: ‘सूर्यघर’ वीज योजनेत नागपूर, पुण्याची आघाडी

Free Electricity Scheme: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी सुरू केलेल्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने बुधवारी (ता. २१) एक लाख घरांचा टप्पा ओलांडला आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी सुरू केलेल्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने बुधवारी (ता. २१) एक लाख घरांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत एक लाख सातशे लाभार्थ्यांनी पॅनेल बसवले आहेत. राज्यात नागपूर, पुणे आघाडीवर आहेत, ही माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

सर्वसामान्य ग्राहकांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीवर भर दिला असून, अधिक लोकांनी योजनेचा लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी आदेश दिले आहेत.

या योजनेत घराच्या छतावर सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्स बसवून वीज निर्माण केली जाते. घरगुती वापरापेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य होते तसेच अतिरिक्त वीज महावितरणच्या जाळ्यात पाठवून उत्पन्नही मिळते. छतावर सौर ऊर्जा पॅनेल्स बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून तीन किलोवॉटला ७८ हजार रुपयांपर्यंत थेट अनुदान मिळते.

घरगुती ग्राहकांच्या मदतीसाठी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ही योजना सुरू केली होती. राज्यात बुधवारी (ता. २१) अखेर या योजनेत एकूण एक लाख सातशे घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसविले गेले. त्यामध्ये ३९२ मेगावॉटची क्षमता निर्माण झाली व ग्राहकांना ७८३ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले. बुधवारी (ता. २१) एका दिवसात ११९५ घरांवर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले आहेत.

पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महावितरणकडे आहे. या योजनेतील ग्राहकांना मोफत नेट मीटर देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना https://pmsuryaghar.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करावी लागते.

त्यांना केंद्र सरकारकडून एक किलोवॉट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॉट क्षमतेसाठी साठ हजार रुपये, तर तीन किलोवॉट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेसाठी ७८ हजार रुपये थेट अनुदान मिळते. घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविता यावा यासाठी बँकांकडून माफत व्याजदरात कर्ज उपलब्ध केले जात आहे तसेच कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यास ग्रामीण ग्राहकांना प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन निधीही देण्यात येणार आहे असे महावितरणकडून सांगण्यात आले.

नागपूर, पुणे आघाडीवर

राज्यात नागपूर जिल्ह्याने सर्वाधिक १६,९४९ घरांवर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. पुणे जिल्ह्यात ७९३१, जळगाव जिल्ह्यात ७५१४, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७०९८, नाशिक जिल्ह्यात ६६२६, अमरावती जिल्ह्यात ५७९५ आणि कोल्हापूर ५०२४ घरांवर पॅनेल बसवले असून राज्यात ही जिल्हे पुढे आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT