
अॅग्रोवन वृत्तसेवा
Solapur News : सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीएम सूर्यघर योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, महावितरणच्या पोर्टलवर आतापर्यंत या रूफटॅाप सोलर योजनेसाठी ७ हजार ९६९ अर्ज आले आहेत. त्यातील ७ हजार ९२६ अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ५८११ सोलरचे काम सुरू आहे, तर २११५ सोलरचे काम पूर्ण झाले आहे.
तसेच सौर ग्राम योजनेअंतर्गत चिंचणी (पंढरपूर), धानोरे (माळशिरस), हिपळे (दक्षिण सोलापूर) या गावांची निवड करण्यात आली आहे.
पीएम सूर्यघर योजना ही भारत सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या अंतर्गत देशभरातील एक कोटी कुटुंबांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे.
संपूर्ण देशभरात या योजनेच्या माध्यमातून वीजपुरवठा करून एक कोटी घरांना प्रकाश देण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत शासन अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करेल, त्यांना सवलतीच्या दरात बँक कर्जही दिले जाईल, यासाठी एक राष्ट्रीय ऑनलाइन पोर्टल तयार केले जाईल. यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा एकत्रित केल्या जातील, एक प्रकारे हे पोर्टल इंटरफेस सारखे कार्य करणार आहे.
ही योजना सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःचे घर असणे आवश्यक आहे. घराच्या छतावर सोलर रुफ टॉप सिस्टिम बसवण्यासाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे. योजनेसाठी अर्ज करणे आवश्यक असून, कागदपत्रे जमा करणे ही आवश्यक आहे. अर्जदाराकडे वैद्य विद्युत कनेक्शन असावे, अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही इतर सोलर पॅनेल सबसिडीचा लाभ घेतलेला नसावा.
...अशी आहे योजना
शून्य ते १५० युनिटपर्यंत विजेचा वापर, एक ते दोन किलोवॉट क्षमतेची सौर प्रणाली, सबसिडी तीस ते साठ हजार रुपये
१५० ते १५० युनिटपर्यंत विजेचा वापर, दोन ते तीन किलो क्षमता सौर प्रणाली, सबसिडी ६० ते ७८ हजार रुपये.
३०० पेक्षा जास्त युनिट विजेचा वापर, तीन किलोवॉट क्षमता सौर प्रणाली, सबसिडी ७८ हजार रुपये
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.