PM Surya Ghar Scheme : ‘पीएम-सूर्यघर’अंतर्गत एक कोटी कुटुंबांना मिळणार मोफत वीज

PM-Surya Ghar : Free electricity : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम-सूर्य घर : मोफत वीज योजनेअंर्तगत ७५०२१ कोटी रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिली.
PM-Surya Ghar
PM-Surya GharAgrowon
Published on
Updated on

New Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम-सूर्य घर : मोफत वीज योजनेअंर्तगत ७५०२१ कोटी रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिली.

यामाध्यमातून १ कोटी घरांच्या छतांवर सौर पॅनल (आरटीएस) बसवण्यात येणार असून कुटुंबांना दर महिना ३०० युनिट्सपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पंतप्रधानांनी १३ फेब्रुवारी २०२४ रोजी ही योजना सुरू केली होती.

PM-Surya Ghar
Solar Agriculture Scheme : शेतकऱ्यांना आता मिळणार दिवसा वीज, महावितरणची नवी योजना

या योजनेअंतर्गत २ किलोवॅट क्षमतेच्या प्रणालीसाठी खर्चाच्या ६० टक्के आणि २ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या प्रणालीसाठी अतिरिक्त प्रणाली खर्चाच्या ४० टक्के केंद्रीय आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. सध्याच्या प्रमाणित किमतीनुसार १ किलोवॅटच्या प्रणालीसाठी ३०,००० अनुदान, २ किलोवॅटच्या प्रणालीसाठी ६०,००० रुपयांचे अनुदान, ३ किलोवॅट आणि त्याहून अधिक क्षमतेच्या प्रणालीसाठी ७८,००० रुपयांचे अनुदान केंद्र सरकारकडून दिले जाणार आहे.

PM-Surya Ghar
Solar Energy : बुलडाण्यात २ हजार ग्राहक झाले वीज निर्माते

सौर पॅनल योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या कुटुंबांना https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलच्या माध्यमातून स्वतःची नोंदणी करून अनुदानासाठी अर्ज करता येईल आणि छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी विक्रेत्याची निवड करता येईल.

या योजनेच्या माध्यमातून कुटुंबांच्या वीजबिलात बचत होईल तसेच वितरण कंपन्यांना अतिरिक्त विजेची विक्री करून अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल. ३ किलोवॅट क्षमतेच्या प्रणालीद्वारे एका कुटुंबाला दरमहा सरासरी ३०० युनिट्स विजेची निर्मिती करता येईल. या योजनेमुळे दळणवळण, पुरवठा साखळी, विक्री, स्थापना, संचालन आणि देखभाल आणि इतर क्षेत्रात मिळून सुमारे १७ लाख थेट रोजगार उपलब्ध होण्याचा असा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com