Solar Power Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Power: सांगली, कोल्हापुरात ‘सौर कृषिवाहिनी’ योजनेला गती द्या; लोकेश चंद्र

Maharashtra Farmers: शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० मधून शेतकऱ्यांचे दिवसा वीजपुरवठा होणार आहे.

Team Agrowon

Sangali News: शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० मधून शेतकऱ्यांचे दिवसा वीजपुरवठा होणार आहे. सांगली जिल्ह्यात १०३ ठिकाणी एकूण ६७९ मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून याद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठा होईल. योजनेच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिले.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात गुरुवारी (ता. ७) मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सची आढावा बैठक झाली. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तृप्ती धोंडमिसे, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या स्वतंत्र संचालक नीता केळकर, सल्लागार श्रीकांत जलतारे, पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, कोल्हापूर परिमंडल कार्यालयाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, विशेष कार्य अधिकारी मंगेश कोहाट, विद्युत निरीक्षक संजय राठोड उपस्थित होते.

लोकेश चंद्र म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू झालेली सौर कृषिवाहिनी योजना २.० ही सर्वांत मोठ्या विकेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्पांची साखळी आहे. यातून पुढील एक वर्षात १६ हजार मेगावॅट विजेचा शेतीला दिवसा पुरवठा करण्यात येणार आहे. सध्या १३ ठिकाणांवरील एकूण ८५ मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जा प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असून यातून २४,२४३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होत आहे.

तसेच सौर प्रकल्पांसाठी आवश्यक शासकीय व खासगी जमीन उपलब्ध करून घेणे, भूसंपादन करणे व सौर प्रकल्पांसाठी आवश्यक पायाभूत सेवेत सुधारणा करावी. लोकसंवाद व सहकार्यातून या योजनेला गती देण्यासाठी पुढाकार घ्यावा.

ते म्हणाले, की उद्योग व महावितरण यांनी एकत्र येऊन काम केले तर त्यांच्या समस्या लवकर सुटतील. समस्या सोडविण्यासाठी स्वागत सेल व पोर्टल आहे. राज्याचा उद्योग लोड दरवर्षी ६ टक्के वाढतो हे गृहीत धरून महावितरण नियोजन करत आहे. वीजवितरण जाळे सक्षमीकरण, नवीन जोडणी तसेच इतर सर्व कामे एसओपीनुसार आणि थकबाकीसह वीज वसुली करावी. 

 ‘शेतकऱ्यांचे गैरसमज दूर करा’

कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी छत्रपती ताराराणी सभागृहात टास्क फोर्सची आढावा बैठक झाली. या वेळी महावितरण कार्यकारी संचालक (देयक व महसूल) परेश भागवत, सल्लागार श्रीकांत जलतारे, प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, विशेष कार्य अधिकारी मंगेश कोहाट, महापारेषणचे शिदाप्पा कोळी, विद्युत निरीक्षक शकील सुतार उपस्थित होते.

‘जिल्ह्यात ७७ ठिकाणी एकूण ३२० मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या माध्यमातून शेतीला दिवसा वीजपुरवठा होणार आहे. सध्या ११ ठिकाणांवरील एकूण ३९ मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जा प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असून यातून १४,९४२ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होत आहे.

या योजनेबाबत शेतकऱ्यांचे गैरसमज दूर करत त्यांचे प्रबोधन करा’, असे आदेश लोकेश चंद्र यांनी दिले. ते म्हणाले, ‘एजन्सीने सर्व कामांचे अपडेट पोर्टलवर करणे बंधनकारक असून, या कामाची पडताळणी नोडल अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी यांनी करावी. ’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Compensation: पीकविम्याची भरपाई सोमवारी थेट खात्यात येणार; २०२२ ते रब्बी २०२४-२५ ची भरपाई मिळणार

Agrowon Podcast: कापूस दर दबावातच; उडद- ढोबळी मिरचीचे भाव स्थिर, काकडीचे दर नरमले, तर पेरुचा आवक स्थिर

Ragi Cultivation: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात, नाचणी रोप लागवड पूर्ण

Monsoon Rain: आज, उद्या राज्यात पावसाची शक्यता; विदर्भात पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता

Kharif Sowing: अतिपावसामुळे कोल्हापुरात २० हजार हेक्टर पेरणीविना

SCROLL FOR NEXT