Solar Power Scheme: सौर ऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न

Ajit Pawar: शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीज देण्यासाठी राज्य सरकार सौरऊर्जेवर आधारित योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. मुढाळे येथे 220/33 KV उपकेंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा विश्वास व्यक्त केला.
DCM Ajit Pawar
DCM Ajit PawarAgrowon
Published on
Updated on

Baramati News: राज्यात पीएम-सूर्य घर : मोफत वीज योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजनिमिर्तीवर भर देण्यात येत आहे, आगामी काळात नागरिकांच्या वीज देयकात बचत करण्याच्या दृष्टीने दिवसा वीज उपलब्ध करून देण्यास शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन शुक्रवारी (ता.१६) उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

मुढाळे येथे महापारेषणच्या २२०/३३ के.व्ही. उपकेंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी महापारेषणचे मुख्य अभियंता अनिल कोळप, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता संदीप हाके, उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, राजकुमार जाधव, संभाजी होळकर, सचिन सातव, ॲड. केशवराव जगताप उपस्थित होते.

DCM Ajit Pawar
Parbhani Solar Panel : सौर ऊर्जा उपकेंद्रांची कामे लवकर करा; परभणी पालकमंत्र्यांकडून सूचना

श्री. पवार म्हणाले, की शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी याकरिता याकरिता सुमारे २४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. शेतात सौर कृषी पंप देण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या ७.५ अश्‍वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपाना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला असून सुमारे ४४ लाख शेतकऱ्यांना लाभ घेतला आहे.

DCM Ajit Pawar
Solar Project : मराठवाड्यातील दोन जिल्ह्यात आणखी ५ सौर ऊर्जा प्रकल्प सुरू

उपकेंद्रामुळे विजेच्या समस्या सुटणार

मुढाळे गावासहित परिसरातील विजेची समस्या विचारत घेता महापारेषणच्या २२०/३३ के.व्ही. उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. या उपकेंद्राकरीता सुमारे ६२ कोटी ७० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे, उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर मुढाळे, माळेगाव, पणदरे, सांगवी, होळ, कऱ्हावागज, कोऱ्हाळे आदी गावांना नियमित दाबाने अखंड वीजपुरवठा होण्यासह विजेचा भारही कमी होणार आहे.

खरिपात बियाणे, खते, कीटकनाशके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बियाणे, खते, कीटकनाशके उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा खरीप हंगाम आढावा आवश्यक ते नियोजन करण्यात येईल. याबाबतीत कुठलीही कमतरता भासणार नाही, याकरिता कृषी खात्यासोबत लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत दर्जेदार रोपे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com