Yavatmal News : उद्योगाअभावी कायमस्वरूपी रोजगाराचा अभाव त्यासोबत रब्बी पिकाखालील जेमतेम क्षेत्र यामुळे पुसद तालुक्यातील मजूरांकडे स्थलांतरशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही. दिवाळीनंतर स्थलांतरणात वाढ होत असल्याने गावे ओस पडतात. .राजकारण्याच्या निष्क्रीयतेमुळे पुसद तालुक्यात उद्योगधंदे उभे राहिले नाहीत. परिणामी बारमाही रोजगारासाठी या परिसरात कोणतेच साधन नाही. त्यामुळे शेती हाच रोजगाराचा एकमेव पर्याय ठरला आहे. .Labor Migration : सातपुडा पहाडातील मजूर कामाच्या शोधात.खरीप हंगामात पुसद तालुक्यात सुमारे ७५ हजार ०५० हेक्टरवर विविध पिकांची लागवड होते. खरीप हंगामातील सोयाबीन काढणीनंतर मात्र मजूरवर्गाच्या हाताला कोणतेच काम मिळत नाही. कारण रब्बी हंगामात जेमतेम १७ हजार २३८ हेक्टरवर पिकांची लागवड होते. यात पुस सिंचन प्रकल्पावर ९,५२४, नदी, नाले व विहिरीच्या माध्यमातून १,७६८ हेक्टर, जिल्हा परिषद सिंचन तलावातून १,१२७ तर इतर स्त्रोतांद्वारे ५,०६५ हेक्टर क्षेत्रात सिंचन होते..या शिवाय उन्हाळी हंगामात केवळ ३,३२५ हेक्टरवर पिके घेतल्या जातात. त्यामुळे बारमाही रोजगाराचा कोणताच स्रोत उपलब्ध नसल्याने गावखेड्यातील मजूरांसमोर स्थलांतरणाशिवाय दुसरा कोणताच पर्याय राहत नाही. रेल्वे वाहतुकीचा पर्याय नसल्याने त्याची मागणी देखील अनेक वर्षांची होती. याला मंजुरी मिळून पाच वर्षांचा कालावधी लोटला आहे. .परंतु अद्याप पुसद पर्यंत केवळ माती भरावाचेच काम पूर्णत्वास जाऊ शकले. त्यामुळे प्रत्यक्षात रेल्वे सुरु होण्यास आणखी किती कालावधी लागेल याबाबत अनिश्चितता आहे. या करिता देखील लोकप्रतिनिधीस्तरावरुन पाठपुरावा होत नसल्याने सामन्यांमध्ये रोष आहे..Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर.इतकेच नाही तर पुसद जिल्ह्याची मागणी देखील अनेक दशकांची असताना त्याच्या पुर्तते संदर्भातही लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून आली आहे. या कारणांमुळे देखील गावखेड्यातील मजुरांमध्ये रोष आहे..औद्योगीक क्षेत्र उजाडमुख्यमंत्री (कै.) सुधाकरराव नाईक यांनी महाराष्ट्र राज्य औद्योगीक विकास मंडळाकरीता जागा आणि सुविधांची उपलब्धता केली. त्यानंतरच्या लोकप्रतिनिधींना मात्र या वैभवात वाढ करता आली नाही. त्यामुळे औद्योगीक क्षेत्राचा विकास रखडल्याने मोठ्या उद्योगांचा या भागात वाणवा आहे. त्याचाही रोजगारनिर्मितीवर परिणाम होत गेल्या काही वर्षात स्थलांतरणात वाढ झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.