Amaravati News : जुलै व ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी आणि सप्टेंबरमधील सततच्या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उत्पादनाची सरासरी यामुळे घटली अशातच खुल्या बाजारात सोयाबीनला हमीदरापेक्षा एक हजार ते १२०० रुपये कमी दर मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे..अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अडीच लाख हेक्टरपैकी ८० हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन जुलै व ऑगस्टमध्येच नष्ट झाले आहे. उर्वरित क्षेत्रातील सोयाबीनला सततच्या पावसाचा फटका बसला आहे. उत्पादनाची एकरी सरासरी दोन ते तीन क्विंटलवर घसरली आहे. .Soybean Procurement : सोयाबीन खरेदी तालुकास्तरावर करा.पेरणी ते काढणीपर्यंतचा खर्च बघितला तर खुल्या बाजारात मिळणाऱ्या दरात शेतकऱ्याच्या हाती काहीच लागत नाही अशी स्थिती आहे. सद्यःस्थितीत खुल्या बाजारात सोयाबीनला सरासरी चार हजार रुपयांचा भाव आहे. त्यातही आर्द्रतेमुळे या दरातही कपात करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात उत्पादन खर्चाइतकाही दर मिळत नसल्याचे चित्र आहे..या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हमीदराने सोयाबीन खरेदी केल्यास शेतकऱ्यांना थोडाफार लाभ होऊ शकतो, असे मत कृषी अभ्यासकांचे आहे. गतवर्षी जिल्ह्यात केंद्र सुरू करताना लक्षांक कमी ठेवण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना फारसा लाभ झाला नाही. यंदा उत्पादनच कमी असल्याने लक्षांक निश्चित करताना ते वाढीव असावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे..Soybean Procurement : सोयाबीन उत्पादकांना प्रतीक्षा हमीभाव खरेदी केंद्रांची.खासदार बळवंत वानखडे यांची मागणीशासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याच्या हालचालीदेखील झालेल्या नाहीत. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांना सोयाबीनची कापणीच करता आली नाही, तर ज्या शेतकऱ्यांनी सोंगणी केली त्यांना प्रति एकर केवळ एक ते दोन क्विंटल एवढेच उत्पादन मिळाले आहे..सध्याच्या मातीमोल भावामुळे शेतकऱ्यांचा मशागत खर्चसुद्धा वसूल होत नाही. जिल्ह्यात तातडीने सोयाबीन खरेदीसाठी शासकीय खरेदी केंद्रे सुरू करावीत, सर्व शेतकऱ्यांकडून हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यात यावी, दिवाळीपूर्वी खरेदी प्रक्रिया गतिमान करून शेतकऱ्यांना उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.