Landslides in Australia Agrowon
ॲग्रो विशेष

Landslides in Australia : पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलनामुळे मृतांचा आकडा ३०० पार; ११०० हून अधिक घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली

Aslam Abdul Shanedivan

Pune News : ऑस्ट्रेलियातील पापुआ न्यू गिनी काओकलम हे अख्ख गाव रात्री गाढ झोपेत असतानाच भूस्खलनामुळे गाडले गेले आहे. दैनिक जागरणच्या वृत्तानुसार काओकलम गावात भूस्खलनामुळे ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ११०० हून अधिक घरे ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. ही घटना शुक्रवारी (ता.२४) पहाटे घडली. यावरून स्थानिक वत्तपत्र पापुआ न्यू गिनी पोस्ट कुरिअरने संसदचे खासदार अमोस अकेम यांच्या विधानाचा हवाला देत म्हटले आहे की, भूस्खलनामुळे ३०० लोकांचा मृत्यू झाला असून ११८२ हून अधिक लोक गाडले गेले आहेत.

शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे ३ वाजता अख्खे काओकलाम गाव नष्ट झाले. जे पीएनजीची राजधानी पोर्ट मोरेस्बीपासून उत्तर-पश्चिमेस ६०० किलोमीटर अंतरावर आहे. तर स्थानिक अधिकाऱ्यांनी या आकडेवारीची पुष्टी केली नसली तरी स्थानिक रहिवाशांनी मृतकांचा आकडा वाढल्याचे ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनला (ABC) सांगितले आहे.

तसेच ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (ABC) म्हणण्यानुसार, दरड कोसळल्याने महामार्गावर जाण्याचा मार्ग बंद झाला असून सध्या हेलिकॉप्टर शिवाय पर्याय नाही. आपत्कालीन पथकांच्या मदतीने चार मृतदेहही परिसरातून काढण्यात आले आहेत.

या दुर्घटनेनंतर पोरगेरा वुमन इन बिझनेस असोसिएशनच्या अध्यक्षा एलिझाबेथ लारुमा यांनी सांगितले की, भूस्खलनामुळे अनेक घरे कोसळली आहेत. येथील अनेक झाडे ही भूस्खलनात नष्ट झाली आहेत. यामुळे दबल्या गेलेल्यांचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. तर या दुर्घटनेवरून लारुमा यांनी PNG सरकारी आणि गैर-सरकारी संस्थांकडून या प्रदेशाला तात्काळ मदत जाहीर केली आहे.

मृतांचा आकडा वाढू शकतो

सध्या मृतांची संख्या ३०० पेक्षा जास्त असू शकते, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी या आकडेवारीला दुजोरा दिलेला नाही.

भूस्खलनापूर्वी भूकंपाचे धक्के

पापुआ न्यू गिनी काओकलमध्ये भूस्खलनापूर्वी भूकंपाचे धक्केही जाणवले होते. हा भूकंप फिन्शाफेनच्या वायव्येस ३९ किलोमीटर अंतरावरचा होता. तर याची तीव्रता ५.३ रिश्टर स्केलची होती. याची पुष्टी युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनेही केली आहे.

पंतप्रधान जेम्स मारापे

या घटनेवरून पंतप्रधान जेम्स मारापे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच आपत्ती अधिकारी आणि संरक्षण दलांनी ग्रामीण भागातील रहिवाशांना मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून ते घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT